शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

लोकसभा निवडणूक निकालावर संशोधन करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:14 IST

सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व्हायला हवी. मात्र पाच वर्षातील भाजप सरकारचा ग्राफ पाहता सर्व समीकरणे विरोधी असतानाही भाजपला बहुमत मिळाले. खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाचे आत्मचिंतन करण्यापेक्षा सर्वांनाच निकालाबाबत संशोधन करण्याची गरज आली आहे, ......

ठळक मुद्देनाना पटोले : भंडारा येथे पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व्हायला हवी. मात्र पाच वर्षातील भाजप सरकारचा ग्राफ पाहता सर्व समीकरणे विरोधी असतानाही भाजपला बहुमत मिळाले. खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाचे आत्मचिंतन करण्यापेक्षा सर्वांनाच निकालाबाबत संशोधन करण्याची गरज आली आहे, असे मत माजी खासदार तथा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी व्यक्त केले.मंगळवारी दुपारी ४ वाजता येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले मागील पाच वर्षात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, शेतकरी आत्महत्येचे प्रमाणही सातत्याने वाढत गेले. महागाई गगनाला भिडली तर डॉलरच्या मागे रुपयाची घसरण झाली. लहान व्यापारी बेहाल झाले. गरीबांच्या योजनांवर घाला घालण्यात आला. अशा विपरित स्थितीतही भाजपला बहुमत कसे काय मिळाले हाच आमचा मुख्य प्रश्न आहे. ईव्हीएम बाबत न्यायालयासह निवडणूक विभागाने मागण्यांकडे दुर्लक्ष केले. मात्र गावापासून राज्यापर्यंत संशोधन होणे गरजेचे असून पुढील निवडणुका बॅलेट पेपरवरच होणे अत्यंत गरजेचे असल्याचेही नाना पटोले यांनी आवर्जून सांगितले.हारणे व जिंकणे या स्पर्धेतील बाजू असल्या तरी लोकशाही रूजविलेल्या देशात पारदर्शकता असणे अत्यंत गरजेचे आहे. निकालानंतरची परिस्थिती पाहता देशात भीतीचे वातावरण आहे. निकाल हाती आल्यानंतर कुठेही मतदारांमध्ये उत्साह दिसून येत नाही. कुठेतरी काही कमी आहे व यावरच लोकांच्या मनातील संशय संशोधनाच्या माध्यमातून समोर येणे अत्यंत गरजेचे आहे. येणारी निवडणूक बॅलेट पेपरवरच व्हावी अशी आमची मुख्य मागणी असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९