शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

ग्रामीण भागात वित्तीय विकास साक्षरतेची गरज

By admin | Updated: July 16, 2015 00:58 IST

ग्रामीण जनतेला दैनंदिन गरजाची पूर्तता व मानवी जीवन सुरक्षा कवच निर्माण करण्याकरिता वित्तीय विकास साक्षरतेची गरज आहे,

नाबार्डचा वर्धापन दिन : अरविंद खापर्डे यांचे प्रतिपादनभंडारा : ग्रामीण जनतेला दैनंदिन गरजाची पूर्तता व मानवी जीवन सुरक्षा कवच निर्माण करण्याकरिता वित्तीय विकास साक्षरतेची गरज आहे, असे प्रतिपादन नाबार्डचे भंडारा जिल्हा विकास अधिकारी अरविंद खापर्डे यांनी केले. नाबार्डच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त तुमसर तालुक्यातील आलेसूर येथे उद्घाटनप्रसंगी बोलत होते. नाबार्ड जिल्हा कार्यालय भंडारा व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने नाबार्डच्या वर्धापन दिनानिमित्त वित्त साक्षरता जनजागृती कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन तुमसर तालुक्यातील वाडी प्रकल्पातील आलेसूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आलेले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अरविंद खापर्डे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विदर्भ कोकण विकास बँकेचे विभागीय व्यवस्थापक नरेंद्र डुंबरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गर्रा (बघेडा) बँकेचे व्यवस्थापक नवघरे व धनंजय खंडेरा, आलेसूरच्या सरपंच छाया टेकाम, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे अविल बोरकर, बेलेकर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे पृथ्वीराज शेंडे, चिखलीचे उपसरपंच रोशन सातवान उपस्थित होते.खापर्डे यांनी ग्रामस्थांकरिता बँकेचे जीवन सुरक्षा कवच निर्मितीच्या विमा योजनाची कार्यपद्धती व उपयोगितेचे महत्व पटवून सांगितले. डुंबरे यांनी बँक द्वारा राबविण्यात असलेल्या विविध विकासाच्या योजना प्रभावीपणे ग्रामीण जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्यपद्धतीवर मार्गदर्शन केले. अविल बोरकर यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत घेणाऱ्या विविध योजना १५ आॅगस्टच्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी वैयक्तिक लाभाची कामे व सामूहीक लाभाच्या कामाची मागणी करण्याची व वाडी प्रकल्पाला यशस्वी करण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यामधून वित्त साक्षरता अभियान अंतर्गत प्रतिनिधींनी पथनाट्य जागृती चमूने मनोरंजनातून ग्रामस्थांना बँकेच्या कार्यपद्धती व योजनेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे संचालन गौतम नितनवरे वाडी प्रकल्प समन्वयक यांनी केले व आभार जगन्नाथ कटरे प्रकल्प सहाय्यक यांनी केले. (शहर प्रतिनिधी)