शंकरराव लिंगे यांचे प्रतिपादन : माळी समाजातील गुणवंतांचा सत्कारसाकोली : ५० वर्षे जगायचे असेल तर शेतात झाडे लावा. १०० वर्षे जगायचे असेल तर माणसे जुळवा आणि हजारो वर्षे जगायचे असेल तर थोर पुरुषांच्या विचारांचे अनुसरण करून ते आत्मसात करावे असे प्रतिपादन अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी व्यक्त केले.सेंदूरवाफा येथील मंगलमूर्ती सांस्कृतिक सभागृहात आयोजित माळी समाजातील गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव अविनाश ठाकरे, विदर्भ संघटक समितीचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र महाडोळे, आयपीएस संदीप मोहुर्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डोईफोडे, गोविंद वैराळे, खंडविकास अधिकारी मंजुषा भेदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल भेदे, विष्णू नागरिकर, अनिल डोंगरवार, जिल्हा परिषद सदस्य रेखा भुसारी, डॉ.श्रीकांत भुसारी, गायत्री ईरले, तुमसर पंचायत समिती सभापती कविता बनकर, शिक्षणाधिकारी (नागपूर) मनोहर बारस्कर, नगरसेवक धर्मेंद्र नंदरधने, कुसुम कांबळे, संतोष भेदे, डॉ.संजय मानकर आदी उपस्थित होते. यावेळी लिंगे यांनी थोरा मोठ्यांचा सल्ला, व्यापाऱ्यांचा गल्ला आणि युवकांचा हल्ला हा समाजाच्या जडण घडणीत महत्वाचा आहे. तर समाजबांधवांनी शेतीपुरता मर्यादित न राहता शिक्षण प्रवाहात येऊन मार्गक्रमण केले पाहिजे. महात्मा ज्योतीराव फुले यांनी हंटर कमिशनपुढे आग्रह धरून प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याची मागणी लावून धरली होती. त्याची आज पूर्तता झाल्याचे दिसून येत असल्याचे प्रतिपादन केले.दरम्यान अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने समाजातील गुणवंतप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार, समाजातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व विविध विभागात कार्यरत राहून शासकीय सेवा देणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीकांत भुसारी तर संचालन माणिक खर्डेकर, प्रा.डॉ.जयश्री सातोकर यांनी केले तर आभार अनिल किरणापुरे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रकाश आटाळकर, यशवंत उपरीकर, भागवत मदनकर, रविकिरण भुसारी, सुनील उपरीकर, नामदेव कांबळे, खुशराम किरणापुरे, अरविंद बनकर, नितेश किरणापुरे, प्रा.आनंद मदनकर, राधेश्याम आमकर, रमेश गोटेफोडे, निखिल उपरीकर, मधुसूदन किरणापुरे, प्रा.नाजूक बनकर, मनोहर इटवले, हिरालाल किरणापुरे, दुधराम नागरीकर, राजकुमार इटवले, गुलशन आत्रीकर आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
थोरांच्या विचारांच्या अनुकरणाची गरज
By admin | Updated: October 21, 2015 00:46 IST