शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

विकासासाठी प्रामाणिकतेची गरज

By admin | Updated: January 28, 2016 00:30 IST

जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी शासन व प्रशासन कटिबद्ध आहे.

जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे प्रतिपादन : प्रजासत्ताक दिनी विविध कार्यक्रमभंडारा : जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी शासन व प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांनी सुद्धा विकासाच्या प्रक्रियेत सहभाग घेऊन अमूल्य योगदान द्यावे, जिल्ह्याची प्रगती आणि विकासाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक आणि पारदर्शकपणे कर्तव्य पार पाडावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी व्यक्त केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावरील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पोलीस अधीक्षक विनिता साहू, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी, लोकशाही प्रणाली मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राने कायम आपले योगदान दिले. पुरोमागी विचारसरणीच्या महाराष्ट्राने देशाला अनेक लोकाभीमुख कायदे दिले. पारदर्शक व गतीमान प्रशासनासाठी शासन अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी पोलीस दल, गृहरक्षक दल, पोलीस श्वान पथक, पोलीस बँड पथक आणि एन.सी.सी., स्काऊड गाईड पथकाने पथसंचलन केले. दरम्यान शहरातील विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी विविधारंगी कार्यक्रम सादर केले. रॉयल पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने राष्ट्रभक्तीपर गीतांची धून वाजवून सर्वांचे मने जिंकले. नूतन कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य सादर केले. रस्ता सुरक्षा संबंधी चित्ररथाचे संचलन व पंचायत समिती, संत शिवराम महाराज उच्च प्राथमिक शाळा यांच्या वतीने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करण्याच्या चित्ररथाचे आयोजन केले होते. अंकुर विद्यामंदिरच्या चिमुकल्यांनी कब बुलबुल पथकाने सादर केलेले पथसंचलन विशेष आकर्षण ठरले. यावेळी जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात साकोली तालुक्यातील बिरसी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विजया राऊत यांना सन २०१५ चा राष्ट्रीय फेलोरेंस नायंटीगेल पुरस्कार दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यासाठी त्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय कौशल्य स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या अंकुश नंदनवार, स्वयंरोजगार क्षेत्रातील कार्याबद्दल बासोऱ्याचे प्रदीप रामटेके, लाखनीचे सुमेध मेश्राम, भंडाऱ्याचे दुर्गेश रगडे, बाम्हणीच्या शुद्धशिला दहिवले व गणेशपूरचे कृष्णा खोब्रागडे यांचा सत्कार करण्यात आला. स्काऊट गाईड चळवळीत पवनी विद्यालय पवनी, नवप्रभात हायस्कुल कोथुर्णा, जि. प. हायस्कुल, वरठी, शारदा विद्यालय तुमसर, जि. प. हायस्कुल मोहाडी या शाळांना राज्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. ध्वजनिधी संकलनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दिपक लिमसे, उत्कृष्ट तलवारबाज म्हणून सौरभ तोमर, आट्यापाट्या खेळात दिपाली शहारे, हँडबॉल क्रीडा मार्गदर्शक हेमंत धुमनखेडे, उत्कृष्ट क्रीडा संघटक अरुण बांडेबुचे यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. (नगर प्रतिनिधी)