नरेश डहारे यांचे प्रतिपादन : तिड्डी येथे सकस आहार कार्यक्रम मार्गदर्शन भंडारा : मानवाचे शरीर व मन स्वस्थ ठेवण्यासाठी आरोग्य जपावे लागते. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सकस आहाराची गरज आहे. पालकांनी पाल्यांच्या आहार व खेळाकडे लक्ष देवून देशाची भावी पिढी घडवावी असे प्रतिपादन कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांनी व्यक्त केले. पशुसंवर्धन विभागाच्या अखत्यारीत मानेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ च्या वतीने तिड्डी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला डहारे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.राजू शहारे, डॉ.वरारकर, डॉ.किशोर कुंभरे, विनोद पेशने, पशुपालक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र मेश्राम, प्रशांत पेशने, जनार्दन मते, नामदेव ढेंगे, देवचंद खोबरे, खुशाल ठाकरे, मुख्याध्यापक हटवार, पशुधन विकास अधिकारी डॉ.गुणवंत भडके आदी उपस्थित होते. यावेळी के.के. पंचबुद्धे, डॉ.किशोर कुंभरे, यांनी मार्गदर्शन केले. शहारे यांनी, कुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना महत्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या आहारात पोषक मूल्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे शारीरिक वाढ व मेंदूची वाढ, हाडांची वाढ होण्यास मदत होते. संचालन डॉ.गुणवंत भडके यांनी केले. कार्यक्रमाला नरेंद्र मेश्राम, किशोर कांबळे, राहुल खोब्रागडे, नितीन मारबते आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना शिक्षणासह सकस आहाराची गरज
By admin | Updated: October 17, 2016 00:35 IST