शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
5
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
6
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
7
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
8
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
9
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
10
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
11
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
12
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
13
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
14
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
15
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
16
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
17
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
18
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
19
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
20
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
Daily Top 2Weekly Top 5

यशासाठी ध्येयाची गरज

By admin | Updated: September 9, 2014 23:16 IST

जीवनात यश संपादन करण्यासाठी सुरुवातीला ध्येय ठरविणे आवश्यक आहे. ध्येय ठरविल्यानंतर त्यासाठी चिकाटी, जिद्द, कठोर परिश्रम, करणे गरजेचे आहे. स्वत:चे जीवन यशस्वी करणे हे त्या व्यक्तीच्याच हातात असते.

भंडारा : जीवनात यश संपादन करण्यासाठी सुरुवातीला ध्येय ठरविणे आवश्यक आहे. ध्येय ठरविल्यानंतर त्यासाठी चिकाटी, जिद्द, कठोर परिश्रम, करणे गरजेचे आहे. स्वत:चे जीवन यशस्वी करणे हे त्या व्यक्तीच्याच हातात असते. त्यासाठी स्वत: मेहनत करावी लागते. प्रशासकीय सेवेतून जो मानसन्मान मिळतो तो इतर कुठेही मिळत नाही. आजचे युग हे संगणकाचे युग आहे. त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर सावधानपूर्वक वापर करा, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक कैलाश कणसे यांनी केले.जे.एम. पटेल महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून नाथे करिअर अकादमी नागपूरचे संजय नाथे, जे.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.राहुल मानकर उपस्थित होते.यावेळी डॉ.विकास ढोमणे म्हणले, जीवनात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट मार्गाचा वापर करू नये. जर शॉर्टकट मार्गाचा वापर केल्यास पाहिजे ते यश संपादन करू शकत नाही. तसेच महाविद्यालयात जवळपा ४५ कोर्सेस चालविले जातात. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून येण्यासाठी सर्व सोयीसुविधा महाविद्यालयामध्ये करण्यात आलेल्या आहेत. या कार्यक्रमाचे संचालन प्रा.शैलेश वसानी यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रा.विशाखा वाघ यांनी करुन दिला. आभारप्रदशरन दिव्या कटकवार यांनी केले. कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागातील प्रा.प्रशांत वाल्देव, प्रा.डॉ.आनंद मुळे, प्रा.धनराज घुबडे, प्रा.प्रशांत निमजे, प्रा.तृप्ती राठोड, प्रा.प्रशांत गायधने, प्रा.नंदिनी मेंढे तसेच मनोहर पोटफोडे, घनश्याम चकोले, विनोद नक्षूलवार तसेच वाणिज्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष सोमेश्वर बोंदरे व वाणिज्य अभ्यास मंडळाचे सचिव रोशनी मेघवाणी, स्नेहा रॉय, अमर गेडाम, रॉबीन सोनटक्की, निलेश लिल्हारे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)