शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रदान चळवळीसाठी जागृत समाज निर्मितीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:52 IST

माणसामध्ये श्रद्धा असली पाहिजे ती डोळसपणाची नको, तर ती दुरदृष्टीकोणातील परिवर्तनशिल श्रद्धा असावी, अंधश्रद्धा ही कौटुंबिक जिवनाला घातक ठरतो. याकरिता विद्यार्थ्यामध्ये लोकजागृती निर्माण करण्याची गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने नेत्रदान चळवण यशस्वी होईल, असे प्रतिपादन आमदार रामचंद्र अवसरे यांनी केले.

ठळक मुद्देरामचंद्र अवसरे : भंडारा येथे नेत्रदान पंधरवाडा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : माणसामध्ये श्रद्धा असली पाहिजे ती डोळसपणाची नको, तर ती दुरदृष्टीकोणातील परिवर्तनशिल श्रद्धा असावी, अंधश्रद्धा ही कौटुंबिक जिवनाला घातक ठरतो. याकरिता विद्यार्थ्यामध्ये लोकजागृती निर्माण करण्याची गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने नेत्रदान चळवण यशस्वी होईल, असे प्रतिपादन आमदार रामचंद्र अवसरे यांनी केले.महाराष्ट्र शासन जिल्हा आरोग्य सेवा व जिल्हा अंधत्व नियंत्रण व दृष्टीक्षीणता सोसायटी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रीय पोषाहार व नेत्रदान पंधरवाडाचे समारोप प्रसंगी अध्यक्षीय भाषणात आमदार बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल वढे, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. रेखा धकाते, डॉ. विनोद घडसिंग, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. पशिने, आहारतज्ञ विनिता चकोले उपस्थित होते.डॉ. माधुरी थोरात म्हणाल्या की, आपण रोजच्या आहारामध्ये जे अन्न खातो ते पोषक असल्यामुळे विदेशी जंकफुड व फास्टफूच्या आहारी पालकांनी व मुलांनी जावू नये ते मुलांच्या आरोग्याला घातक आहे. नेत्रदान हे श्रेष्ठ दान असल्यामुळे संपूर्ण जग आपण नेत्रदानाद्वारे बघू शकतो व तशी संधी अंधाना उपलब्ध करून द्यावी. आहारतज्ञ विनिता चकोले यांनी शरीराला लागणारे पोषाहार संबंधी सखोल माहिती याप्रसंगी दिली.उपस्थित सामाजिक कार्यकर्ता दिलीप चित्रीव आपल्या मनोगता आपल्या गावातील म्हणजे विरली बु. येथील संकल्पना सांगितले की जिल्हामध्ये असं एक गाव म्हणजे विरली बु. या गावात कोणाचाही मृत्यु झाल्यास नेत्रदान केल्या जातो. आतापर्यंत शासनाकडून कोणताही सहकार्य न घेता २००४ पासून गावात तसेच परिसरात आॅगस्ट २०१८ पर्यंत एकूण ७५ व्यक्तीचे नेत्रदान घडवून आणले. ही नेत्रदानाची चळवळ संपूर्ण जिल्हामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. प्रसंगी नेत्रदान पंधरवाडा व राष्ट्रीय पोषहार सप्ताह निमित्त्याने जिल्ह्यातील विविध शाळामध्ये घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला, रांगोळी व व्याख्यान स्पर्धेच्या यशस्वी विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्याच्या हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. रेखा धकाते यांनी केले. संचालन सोनाली लांबट हिने केले. उपस्थितांचे आभार डॉ. विनोद घडसिंग यांनी केले.

टॅग्स :Healthआरोग्य