जनजागृती व शोध मोहीम : भाग्यश्री गिल्लोरकर यांचे प्रतिपादनभंडारा : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या जनजागृती अभियान व शोध सर्वेक्षण मोहीम अभियान यशस्वी होत आहे. जिल्ह्यातील कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असून कुष्ठरोग मुक्तीचा संकल्प सर्वांनी करावा असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी व्यक्त केला.लाखनी तालुक्यातील पिंपळगाव (सडक) येथे जिल्हा परिषद हायस्कुल पिंपळगावच्या प्रांगणात कुष्ठरोग जनजागृती व कुष्ठरोग शोध मोहीमेचा जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाला सरपंच शाम शिवणकर, पंचायत समिती सभापती रजनी आत्राम, जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.वाय.बी. कांबळे, उपसरपंच भाजीपाले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.झलके, डॉ.खंडारे, डॉ.मिलिंद मोटघरे आदी उपस्थित होते. यावेळी गिलोरकर यांनी हे अभियान यशस्वी होण्यासाठी लोकप्रतिनिधी तथा नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे. समाजात संशयीत कुष्ठरुग्ण आढळल्यास आरोग्य विभागाला त्याची माहिती द्यावी व आरोग्य विभागानेही त्यांच्यावर योग्य तो औषधोपचार करावा असे प्रतिपादन केले. यावेळी उपस्थितांचेही समायोचित भाषणे झाली. दरम्यान डॉ.कांबळे यांनी कुष्ठरोगाची लक्षणे मेगा फोनद्वारे आयईसी करणे, भिंतीवर कुष्ठरोगबाबत म्हणी लिहिणे, लोकप्रतिनिधींच्या सभेत आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे माहिती देणे. तपासणी दरम्यान संशयीत कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत निदान व औषधोपचार करण्यासंदर्भात सहकार्य करण्याचे प्रतिपादन करण्यात आले. ,डॉ.विजय डोईफोडे यांनी जिल्ह्यात दरवर्षी कुष्ठरोगाच्या संख्येत वाढ होत आहे. सन २०१० मध्ये ४०२, २०११ मध्ये ५३४, २०१२ मध्ये ५९२, २०१३ मध्ये ६२५, २०१४ मध्ये ५०० तर २०१५ मध्ये ६३१ व आॅगस्ट अखेरपर्यंत २३२ कुष्ठरुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती दिली. औषधोपचार करून कुष्ठरोग बरा करण्यासंदर्भात आरोग्य विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.संचालन सरिता दोनोडे तर आभार नूरचंद पाखमोडे यांनी मानले. कार्यक्रमाला चंद्रशेखर भिवगडे, रविंद्र पडोळे, दिनेश पाखमोडे, डॉ.जीवने, मुख्याध्यापिका आकरे, गटशिक्षणाधिकारी वाघाये, तालुका आरोग्य अधिकारी मोटघरे यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
कुष्ठरोग मुक्तीसाठी सहकार्याची गरज
By admin | Updated: October 7, 2015 01:51 IST