शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

ध्येय सिद्धीकरिता प्रयत्नांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:29 IST

आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली असल्याचे मत व्यक्त केले. तसेच बौद्धिक शिक्षणाबरोबर विद्यार्थी जीवनात कौशल्य व शारीरिक शिक्षणाचे असामान्य महत्व आहे.

ठळक मुद्देप्रफुल पटेल : मनोहरभाई पटेल महाविद्यालयात स्वर्ण जयंती महोत्सव

आॅनलाईन लोकमतसाकोली : आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली असल्याचे मत व्यक्त केले. तसेच बौद्धिक शिक्षणाबरोबर विद्यार्थी जीवनात कौशल्य व शारीरिक शिक्षणाचे असामान्य महत्व आहे. विद्यार्थ्यांनी ध्येयसिद्धीकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी केले.येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात स्वर्ण जयंती महोत्सव निमित्त आयोजित युवास्वर या वार्षिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन खा. पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. उत्फूर्त भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना स्वत: मधील कलागुण ओळखूण त्याचा लाभ आवडीच्या स्थान प्राप्तीकरिता करून देशाचे आदर्श नागरिक व्हावे, असे ते म्हणाले. याप्रसंगी गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, अविनाश ब्राम्हणकर रामचंद्र कोहळे, डॉ. राजेश चंदवानी, डॉ. अजय तुमसरे हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्राचार्य डॉ. हरेश त्रिवेदी यांनी प्रास्ताविक भाषणातून पाहुण्याचे स्वागत केले. प्रविण वाढई, विद्यार्थी सचिव यांनी उपस्थितांसमोर महाविद्यालयाचा वार्षिक अहवालाचे वाचन केले. अविनाश ब्राम्हणकर यांनी संक्षिप्त भाषणातून विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयाच्या वार्षिक परंपरेनुसार गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना प्रफुल पटेल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आला. याप्रसंगी डॉ. अशोक चुटे यांची गणित व डॉ. टप्पे इंग्रजी यांची नागपुर विद्याशाखेवर निवड झाल्याप्रसंगी तसेच डॉ. सी.जे. खुने यांची एन.सी.सी.चे कॅप्टन पदावर पदोन्नती व डॉ. किशोर नागपुरे यांचे विभागीय समन्वयक एनएसएस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ पदावर राहुन महाविद्यालयात राष्ट्रीय व राज्यस्तरीय योगदानाबद्दल शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.बेस बॉलमध्ये मोनाली धुर्वे, रंजु सोनकुसरे व बॅडमिंटनमध्ये संदीप वलथरे व स्रेहा कापगते यांची अ.भा. विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होऊन तसेच एनसीसी कॅडेट पंकज गायकवाड तसेच एनएसएस कॅडेट प्रशांत पटले यांनी मुंबई येथे आयोजित गणतंत्र परेड २०१८ येथे सहभागी झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आले. आभार प्रदर्शन वार्षिकोत्सव सांस्कृतिक अधिकारी सी.जे. खुणे यांनी केले.