शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन

By admin | Updated: April 16, 2017 00:20 IST

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करणे तथा इतर मागण्या पूर्णत्वाकरिता शासन तथा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता....

तहसील कार्यालयासमोर निदर्शने : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन, सरकारविरुद्ध असंतोष दर्शविलातुमसर : शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करणे तथा इतर मागण्या पूर्णत्वाकरिता शासन तथा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता तुमसर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. तहसीलदारामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले की, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या व विकासाच्या रास्त मागणीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धरणे आंदोलन केले आहे. यात शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ करून सात बारा कोरा करण्यात यावा, शेतीला २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा, विजेचे बिल दिल्ली सरकारसारखे करण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे भाव देण्यात यावे, धानाला कमीत कमी तीन हजार रुपये क्विंटल भाव देण्यात यावे, शेतकरी व शेतमजुरास तीन हजार रुपये प्रति महिना पेंशन देण्यात यावी, केंद्राप्रमाणे महाराष्ट्र शासनने गुळ खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे, तुरीला ५०५० रुपये प्रमाणे दर देण्यात यावे, बाजार समितीत कमी भावाने विक्री केलेली शेतकऱ्यांच्या फरकाची रक्कम द्यावी.सोंड्या टोला उपसा योजनेची वीज त्वरीत सुरु करण्यात यावी, उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त जागेवर तज्ज्ञ डॉक्टरांची भरती करण्यात यावी, राजीव गांधी (सागर) बावनथडी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. नदी काठावरील गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्या गावांना या प्रकल्पातून पाणी सोडण्याचे निर्देश देण्यात यावे, बावनथडी प्रकल्पाचे अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करण्यात यावे, प्रकल्पाचा लाभ न पोहचणाऱ्या गावांना त्वरीत नहरांनी जोडण्यात यावे, बावनथडी व धापेवाडा सिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे, ज्या शेतकऱ्यांना बँकेच्या दबावाखाली कर्ज वसुली दिली त्यांना ती परत करण्यात यावी इत्यादी मागण्यांचा यात समावेश आहे.धरणे आंदोलनात जिल्हा राकाँध्यक्ष मधुकर कुकडे, जिल्हा राकाँ युवक अध्यक्ष अभिषेक कारेमोरे, महिला राकाँध्यक्ष कल्याणी भुरे, सरचिटणीस विजय डेकाटे, भोजराज येवले, शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे, तालुकाध्यक्ष देवचंद ठाकरे, महिला बाल कल्याण व विकास सभापती शुभांगी राहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य धनेंद्र तुरकर, तुमसर विधानसभा अध्यक्ष विठ्ठलदास कहालकर, राजकुमार माटे, प्रेरणा तुरकर, पमा ठाकुर, निशीकांत पेठे, अंकुर ठाकुर, नगरसेवक सलाम तुरक, नगरसेविका खुशलता भवसागर, जि.प. सदस्य रेखा ठाकरे, संगीता सोनवाने, गीता माटे, प्रतीक्षा कटरे, संगीता मुंगुसमारे, गजानन लांजेवार, कादर अंसारी, रामकृष्ण उकरे, राजेश देशमुख, संजय लाखा सह मोठ्या संख्येने राकाँ कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)