शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
4
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
5
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
6
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
7
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
8
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
9
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
10
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
11
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
12
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
13
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
14
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
15
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
16
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
17
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
18
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
19
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
20
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटात मदतीला धावून आली राष्ट्रवादी काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील एकाही कुटुंबावर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी त्यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना गोरगरिबांपर्यंत अन्नधान्य पोहचविण्याचे आदेश दिले. त्यानुसार माजी आमदार राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे धनंजय दलाल यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभर अन्नधान्य वितरण सुरु आहे.

ठळक मुद्देप्रफुल पटेल यांचे निर्देश : जिल्ह्यातील गावागावात अन्नधान्याचे वितरण, समाजासमोर आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी उद्योगधंदे ठप्प पडले. गोरगरिबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अशा संकटाच्या काळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल मदतीला धावून आले. त्यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अन्नधान्याचे वितरण केले जात आहे. रविवारी भंडारा शहरातील विविध भागात गोरगरिबांना मदतीचा हात देण्यात आला.लॉकडाऊनमुळे सध्या रेल्वेसह सर्व वाहतूक सेवा ठप्प आहे. उद्योगधंदे बंद आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे हाल होत आहे. हाताला कामच नाही तर चुल कशी पेटवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व समस्या खासदार प्रफुल पटेल यांच्या निदर्शनास आल्या.जिल्ह्यातील एकाही कुटुंबावर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी त्यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना गोरगरिबांपर्यंत अन्नधान्य पोहचविण्याचे आदेश दिले. त्यानुसार माजी आमदार राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे धनंजय दलाल यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभर अन्नधान्य वितरण सुरु आहे.खासदार प्रफुल पटेल यांनी यापूर्वी पंतप्रधान सहाय्यता निधीला एक कोटी रुपयांचा निधी दिला तर गोंदिया, भंडारा जिल्हा प्रशासनाला कोरोना विरुध्द लढाई लढण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत केली.भंडारा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जीवनाश्यक वस्तूचे वितरण करण्यात येत आहे. तसेच तालुकाभर या कीटचे वितरण करण्यात येणार आहे. इतर गावातील गरीब गरजूनां किट उपलब्ध करुन देण्याचे कार्य भंडारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहे. वितरण प्रसंगी धनंजय दलाल, हेमंत महाकाळकर, यशवंत सोनकुसरे, बाळा गभणे, उमेश ठाकरे, नरेंद्र झंझाड, विजय खेडीकर, भानुदास बनकर, गणेश बानेवार, गणेश चौधरी, महेंद्र बारापात्रे, सुनील मोगरे, निरंजन पाटील, अबरारभाई, दिनेश आगरे, अभय सेलोकर, पुरुषोत्तम बागडे यांच्यासह तालुका व शहर कार्यकारीणीचे पदाधिकारी उपस्थित होते.कोरोनामुळे देश आणि राज्यावर संकट आले आहे. या संकटकालीन परिस्थितीशी शासन व प्रशासन सक्षमपणे लढा देत आहे. मात्र अशा परिस्थितीत आपले देखील समाजाप्रती दायित्व आहे. आपण लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेलो आहे. ईच्छा असून देखील जिल्ह्यात येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमार्फत धान पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु आहे. स्वयंसेवी संस्था व सामाजिक संस्थानी एकत्र येवून गरजूपर्यंत मदतीचा हात पोहोचावा, तसेच शासनाचे नियमांचे पालन करुन आणि सोशल डिस्टन्सिंग राखत मदत द्यावी.- प्रफुल पटेल,खासदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNCPराष्ट्रवादी काँग्रेस