२ जानेवारीला उघडणार टेंडर : साकोली-देसाईगंज-सिरोंचा मार्गगडचिरोली : साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी-आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची निविदा प्रकाशित करण्यात आली असून सदर निविदा २ जानेवारी रोजी २०१६ रोजी उघडण्यात येणार आहे. या महामार्गाच्या कामाची अंदाजे किंमत १६२.२२ असून सदर काम पावसाळ्यासह तीन महिन्यांत पूर्ण करावयाचे आहे. सदर मार्गामुळे दळणवळण, उद्योगधंदे व विकासाला चालना मिळणार आहे.या राष्ट्रीय महामार्गाची निविदा प्रक्रिया आटोपल्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या मार्गाचे भूमिपूजन करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती आहे. सदर राष्ट्रीय महामार्गाची शहरी भागातून १६० फूट रूंदी राहणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
राष्ट्रीय महामार्गाची निविदा निघाली
By admin | Updated: December 3, 2015 01:40 IST