लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर-गोंदिया-रामटेक राष्ट्रीय महामार्ग चिखलमय व खड्डेमय बनला आहे. सिमेंट रस्ता बांधकामाचा फटका सध्या बसत असून लहान व मोठे पुलाचे रपटे धोकादायक बनले आहेत. देव्हाडी शिवारातील पूल पाण्याखाली गेला होता. महामार्ग प्राधीकरणाचे येथे दुर्लक्ष दिसत असून पावसात महामार्ग बंद होणार आहे.रस्ते विकासाचे सशक्त माध्यम आहे. रामटेक-तुमसर-गोंदिया राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देवून सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम सुरू करण्यात आले. दुपदरीकरण रस्ता असून दुसरा रस्ता खड्डेमय झाला आहे. किमान एका बाजुचा सिमेंट रस्ता येथे युद्धस्तरावर पूर्ण करण्याची गरज होती. सिमेंट रस्ता बांधकामापुर्वी महामार्ग प्राधीकरणाने लहान व मोठे पूल पाडले, परंतु तेच पूल आता डोकेदुखी बनले आहे. सदर महामार्गावर कुठे मोठे तर कुठे लहान पूल मोठ्या प्रमाणात आहेत. पावसाळ्यात या रपटे व ओढ्यांना तीव्र गतीने पाणी ओसंडून वाहत असतात. पर्यायी पोचमार्ग गुणवत्तापूर्ण नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात रपटा अनेक ठिकाणी वाहून गेला. जड वाहतुकीची प्रचंड वर्दळ या मार्गावर आहे. पोचमार्ग सध्या चिखलमय बनले आहे. दुचाकी चालक सध्या येथे जीव मुठीत घालून वाहने चालवित आहेत.महामार्गाचे बांधकाम अतिशय संथगतीने सुरू आहे. उन्हाळ्यात अनेक ठिकाणी कामे बंद होती. पाणी, रेती, मुरूमाची टंचाई निर्माण झाली होती. मुरूमाऐवजी लाल मातीचा उपयोग पोचमार्गावर करण्यात आला. पावसाळ्यात ही बऱ्याच ठिकाणी वाहून गेली. त्यामुळे चिखल व खड्डे पडले आहेत. महामार्गाचे बांधकाम पावसाळ्यात सुरु असल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.'लोकमत'चे भाकीत खरे ठरले'लोकमत'ने १८ जुलै रोजी 'तर महामार्ग होणार बंद' या शिर्षकाखाली वृत्त छापून संबंधित विभागाचे लक्ष वेधले होते, परंतु महामार्ग प्राधीकरणाने लक्ष दिले नाही. देव्हाडी येथील रपटा पाण्याखाली गेला होता. तर सरांडी येथील रपटा वाहून गेला होता. सध्या सदर महामार्ग अतिशय धोकादायक ठरले आहे.
तुमसर राष्ट्रीय महामार्गाची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:48 IST
तुमसर-गोंदिया-रामटेक राष्ट्रीय महामार्ग चिखलमय व खड्डेमय बनला आहे. सिमेंट रस्ता बांधकामाचा फटका सध्या बसत असून लहान व मोठे पुलाचे रपटे धोकादायक बनले आहेत. देव्हाडी शिवारातील पूल पाण्याखाली गेला होता. महामार्ग प्राधीकरणाचे येथे दुर्लक्ष दिसत असून पावसात महामार्ग बंद होणार आहे.
तुमसर राष्ट्रीय महामार्गाची चाळण
ठळक मुद्देचिखलमय व खड्डेमय रस्ता : पावसाळ्यात पूल पाण्याखाली येत असल्याने वाढला धोका