शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग १८ तासापासून जाम; भंडारा-नागपूर-लाखनी वाहतूक खोळंबलेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 14:07 IST

डिझेलचा टँकर आणि कंटेनरची धडक बसल्यानंतर टँकर फाटून या दोन्ही वाहनांची पेट घेतला होता.

- गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा : मुंबई-कोलकता या ५३ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर भंडारापासून ६ किलोमीटर अंतरावर गुरूवारी रात्री झालेल्या अपघाताच्या १८ तासानंतरही हा राष्ट्रीय महामार्ग जाम आहे. परिणामत: नागपूर-भंडारा-लाखनी या दरम्यान वाहतूक खोळंबली असून रात्रभरापासून महामार्गावर वाहनांच्या रांगा कायम आहेत.

गुरूवारी रात्री पाऊणेआठ वाजताच्या दरम्यान, डिझेलचा टँकर आणि कंटेनरची धडक बसल्यानंतर टँकर फाटून या दोन्ही वाहनांची पेट घेतला होता. ऐन पुलावर झालेल्या या अपघातामुळे दोन्ही बाजुंची वाहतूक ठप्प झाली होती. रात्री उशिरा आग विझविल्यानंतर मार्ग मोकळा करण्यात आला. मात्र दुतर्फा अडलेल्या वाहनांच्या मोठ्या प्रमाणावरील संख्येमुळे रात्रीपासून वाहतुकीची समस्या कायमच आहे. परिणामत: हा राष्ट्रीय महामार्ग ठप्प पडल्यासारखी स्थिती मागील १८ तासांपासून आहे. या महामार्गचे काम सुरू असल्याने अरूंद पुलावरील मार्गावरून वाहतूक सुरू आहे. दुहेरी वाहतुकीचा मार्ग नसल्याने वाहतुकीला प्रचंड अडथळा होत आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजतासुद्धा हीच परिस्थिती कायम होती. अनेक वाहने अडलेली होती. असा झाला होता अपघात

भंडारापासून ६ किलोमीटर अंतरावरील भिलेवाडा ते पलाडी दरम्यान एआर पेट्रोल पंपाजवळ गुरूवारी रात्री ७:४५ वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली होती. या राष्ट्रीय महामार्गावर भिलेवाडा ते पलाडी दरम्यान महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावरील पुलावरून ही दोन्ही वाहने समोरासमोरून येताना टँकरला कंटेनरची मागून घडक बसली. यामुळे टँकर फुटून डिझेल बाहेर आले आणि दोन्ही वाहनांना आग लागली. यात कंटेनरमधील एकाचा आत फसून जळून मृत्यू झाला होता. तब्बल दोन तासांनंतर दोन अग्नीशामक वाहनांच्या माध्यमातून ही आग विझविण्यात यश आले होते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी