मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर खापा येथे ट्रक, टिप्पर, जड वाहतूक करणारी वाहने थेट रस्त्यावर उभी केली जातात. यामुळे वाहतुकीलाही खोळंबा होतो व अपघाताला आमंत्रण देणारे दृश्य नेहमीच येथे दिसते. रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या शेजारी प्रचंड वाहनांच्या रांगा येथे लागून असतात. त्यामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. संबंधित विभागाचे येथे सतत दुर्लक्ष दिसत आहे. नव्यानेच रस्ता बांधकाम करण्यात आले आहे. रस्त्यावर थेट वाहने उभी केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. रात्री वाहने भोजन व नाश्त्याकरिता येथे थांबतात. परंतु वाहनांची पार्किग व्यवस्था इतरत्र करण्याची गरज आहे. थेट रस्त्यावर वाहने उभी करण्यास येथे कोणीही मनाई करत नसल्याने धोका वाढला आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. मोकळ्या जागेत येथे वाहने उभी करण्याची गरज आहे. पर्यायी व्यवस्था येथे नसल्याने वाहनचालक थेट रस्त्यावरच वाहने उभी करतात.
राष्ट्रीय महामार्ग बनला ट्रान्सपोर्ट हब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:38 IST