लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपक्ष उमेदवार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र भोंडेकर यांच्या नामांकनासाठी निघालेल्या रॅलीची तीन दिवसानंतरही मतदारसंघात चर्चा असून सर्व गर्दीचे सर्व विक्रम मोडून काढले. हजारोंच्या उपस्थितीत निघालेल्या या अभूतपूर्व रॅलीने संपूर्ण रस्ता गर्दीने फुलून गेला होता. भंडारा शहराच्या इतिहासातील नामांकनाची एवढी मोठी रॅली पहिल्यांदाच निघाली असावी.सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सतत आंदोलन करून न्याय मिळवून देणारे नरेंद्र भोंडेकर यांना महायुतीकडून उमेदवारीची अपेक्षा होती. परंतु ऐन वेळेवर त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र त्यांच्या समर्थकांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा त्यांना आग्रह केला. समर्थकांच्या आग्रहास्तवच भोंडेकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. किसान चौकातील शेतकरी पुतळ्याला माल्यार्पण करून भोंडेकर किसनलाल बांगडकर सभागृहात आयोजित मेळाव्याला उपस्थित झाले. येथे परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक, शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैलबंडीतून काढण्यात आलेल्या रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. थोरपुरुषांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे नामांकन दाखल केले.
नरेंद्र भोंडेकरांच्या रॅलीने मोडले विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST