संघटना एकवटल्या : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्र्याच्या नावे तहसीलदारांना निवेदनसाकोली : नगरपरिषदेचे नामांतर करुन साकोली-सेंदुरवाफा नगर परिषद असे नाव द्यावे, या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसिलदार यांच्यामार्फत देण्यात आले. साकोली येथे नगरपरिषदेची घोषणा झाली. यासाठी मागील कित्येक वर्षापासून मागणी करण्यात येत होती. यासाठी सेंदुरवाफा वासीयांनी सहकार्य केले. शेवटी शासनाने साकोली नगरपरिषदेची घोषणा केली. यात सेंदुरवाफा या गावाचाही समावेश मात्र नावात सेंदुरवाफा या गावाला वगळण्यात आले. हा सेंदुरवाफावासींयावर अन्याय आहे. त्यामुळे शासनाने हा अन्याय दूर करावा व साकोली नगर परिषद या नावाऐवजी साकोली सेंदुरवाफा नगरपरिषद असा नाव देण्यात यावे, अशी मागणी या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना साकोली पंचायत समितीचे माजी सभापती मदन रामटेके, जिल्हा परिषदेचे माजी सभापती पद्माकर गहाणे, प्रभाकर सपाटे, प्रदिप मासुरकर, तालुकाध्यक्ष हेमकृष्ण वाडीभस्मे, जया भुरे, निलेश घरडे, निलप्रकाश राऊत, लता दुरुगकर, नरेंद्र वाडीभस्मे, आशा हटवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
नगरपालिकेला साकोली-सेंदूरवाफा नाव द्या
By admin | Updated: July 20, 2016 00:30 IST