शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्प जागतिक दर्जाचे होणार

By admin | Updated: March 12, 2017 00:42 IST

नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्प जागतिक दर्जाचे करण्याकरिता हालचाली सुरू झाल्या आहेत.

नाना पटोले यांचा पुढाकार : अमेरिकन कंपनी करणार गुंतवणूक भंडारा : नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्प जागतिक दर्जाचे करण्याकरिता हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या निधी व्यतिरिक्त अमेरिकन कंपनी गुंतवणुक करणार असल्याची माहिती खासदार नाना पटोले यांनी दिली. या प्रकल्पाकरिता राज्य शासन १०० कोटी तर केंद्र शासनाकडे ६०० कोटी रूपयांची त्यांनी मागणी केली आहे.नागझीरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पाला जागतिक दर्जा प्राप्त व्हावा याकरिता योजना आखण्यात आली आहे. ही योजना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना खासदार नाना पटोले यांनी सांगितली. सरकारने ग्लोबल निविदा काढलेली तर अमेरिकेची कंपनी कोटी खर्च करून नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्प जगाच्या पर्यटन स्थळावर येईल. याकरिता राज्य सरकारने १०० कोटी तर केंद्र सरकारने ६०० कोटी देण्याची गरज आहे. नागझिरा व नवेगाव जंगल ताडोबा पेक्षा घनदाट आहे. या जंगलात रानटी कुत्र्यांचा हैदोस असल्याने वाघ एका ठिकाणी राहत नाही. त्यामुळे पर्यटक इकडे वळत नाही. नद्या जोडण्यात येतील, पर्यटन सुविधा तयार करण्यात येईल, जगाचे पर्यटक याकडे आकर्षित होतील. राज्य शासनाने प्रथम या प्रकल्पाकरिता किमान २०० कोटींचा निधी मंजूर करण्याची मागणी खा. पटोले यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांचेकडे केली आहे. केंद्र शासनाकडे याकरिता पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.वाघांना नवेगाव-नागझिरा जंगलात सुरक्षित विझर करता यावे करिता प्रयत्न आहे. या दोन्ही जंगलात वाघांची संख्या जास्त आहे. वाघांच्या सुरक्षेकरिता विदेशी कंपनीची मदत घेतली जाईल. नागझिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्पात जागतिक सोयी सुविधा उपलब्ध झाल्यास बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल. याकरिता राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री ना. मुनगंटीवार यांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे खासदार नाना पटोले यांनी सांगितले. नागपूर भेटीदरम्यान ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)