शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यातील दोन वाघांच्या मृत्यूचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 15:16 IST

उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील दोन वाघांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात वन्यजीव विभागाला अद्यापही यश आले नाही.

ठळक मुद्देआरोपींचा थांगपत्ता नाहीव्हिसेरा भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थेकडे

ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील दोन वाघांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात वन्यजीव विभागाला अद्यापही यश आले नाही. फॉरेन्सिक रिपोर्टमधून काहीही हाती लागलेले नसल्याने आता वाघांच्या अवयवाचे नमुने (व्हिसेरा) उत्तरप्रदेशातील इज्जतपूरच्या भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थेकडे पाठविण्यात आले आहे. अद्यापपर्यंत या प्रकरणात वन्यजीव विभाग कोणत्याच ठोस निर्णयापर्यंत पोहोचले नसून आरोपींचाही थांगपत्ता नाही.सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात उमरेड-पवनी- कऱ्हांडला अभयारण्याच्या पवनी गेट कक्ष क्रमांक २२६ मध्ये दोन वाघांचा मृत्यू झाला होता. ३० डिसेंबर रोजी टी-१ अर्थात चार्जर आणि दुसऱ्या दिवशी ३१ डिसेंबरला टी-४ अर्थात राही वाघीणीचा मृतदेह आढळला होता. या घटनेने संपूर्ण पेंच वन्यजीव विभाग हादरुन गेला होता. या वाघांच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. शवविच्छेदनानंतर तीन नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले. दुसरीकडे वन्यजीव विभागाने श्वान पथकाच्या मदतीने जंगल पालथे घातले. सुरुवातीला या वाघांवर विषप्रयोग झाल्याचे पुढे आले. शिकारीसाठी टाकलेले विषयुक्त गोळे रानडुकरांनी खाल्ले. त्यातून मृत्यूमुखी पडलेल्या रानडुकरांचे मांस या दोन वाघानी खाल्याने त्यांचा मृत्यू झालाचा प्राथमिक अंदाज काढण्यात आला. परिसरातील नागरिकांची चौकशी करण्यात आली. माहिती देणाºयास बक्षीस घोषित करण्यात आले. परंतु वन्यजीव विभागाच्या हाती काहीच लागले नाही.दरम्यान फॉरेन्सिक विभागाचा अहवाल प्राप्त झाला. मात्र यातून काहीच निष्पन्न होत नसल्याने तपास थंडावला आहे. आता उत्तरप्रदेशातील इज्जतपूरच्या भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थेत या वाघाच्या अवयवाचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. त्याठिकाणी ‘इस्टोपॅथॉलॉजी’ आणि ‘टॉक्झीकोलॉजी’ या तपासण्या होऊन त्यात या वाघांच्या मृत्यूचे खरे कारण पुढे येईल, अशी अपेक्षा आहे. मात्र सध्यातरी या वाघांच्या मृत्यूचे गूढ वन्यजीव विभागाला उकलण्यात अपयश आले, असेच म्हणावे लागेल.अभयारण्याची सुरक्षा वाऱ्यावरवाघांचे वास्तव्य असलेल्या अभयारण्यात सुरक्षेच्या व्यापक उपाययोजना करणे आवश्यक असते. मात्र उमरेड- पवनी- कऱ्हांडला अभयारण्यात अशा कोणत्याही खास उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे दिसून येते. दोन वाघांच्या मृत्यूने वन्यजीव विभागाची मोठी हानी झाली. आता अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले जात आहे. या अभयारण्यात कर्मचाºयांची साधी गस्तही नसल्याचे या दोन वाघांच्या मृत्यूनंतर पुढे आले.उमरेड-पवनी-कºहांडला अभयारण्यातील दोन वाघांचा मृत्यूचा तपास युध्दस्तरावर सुरु आहे. वाघांच्या अवयवाचे नमुने उत्तरप्रदेशात पाठविण्यात आले आहे. तसेच अभयारण्याशेजारी गावातील संशयीतांची चौकशी केली जात आहे. या वाघांच्या मृत्यूचे कारण लवकरच स्पष्ट होईल आणि आरोपी जेरबंद होतील.- राहूल गवई,विभागीय वनअधिकारी, पेंच वाघ्र प्रकल्प

टॅग्स :Tigerवाघ