शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
3
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
4
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
5
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
6
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
7
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
8
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
9
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
10
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
11
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
12
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
13
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
14
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
15
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
16
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
17
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
18
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
19
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
20
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

चार वर्षानंतरही ‘जय’चे बेपत्ता होण्याचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

पवनी-कऱ्हांडला अभयारण्याचे आकर्षण ठरलेला जय वाघ १८ एप्रिल २०१६ रोजी अखेरचे दर्शन देवून बेपत्ता झाला. तो कधीच दिसला नाही. जय वाघ गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातून पवनी तालुक्यातील डोंगर महादेव, खापरी, पाऊनगावच्या जंगलात जून २०१३ मध्ये दाखल झाला होता. त्यावेळी तो केवळ अडीच ते तीन वर्षाचा होता. येथील घनदाट विस्तीर्ण जंगलात तो रमला.

ठळक मुद्देपवनी-कºहांडला अभयारण्य : आशियाचा आयकॉन ठरलेल्या वाघ १८ एप्रिल २०१६ पासून झाला बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : महाराष्ट्रातील सर्वात मोठा भारतातील क्रमांक दोनचा वाघ आणि आशियाचा आयकॉन ठरलेला जय नामक वाघ बेपत्ता होवून आता चार वर्ष झाली आहेत. परंतु वन्यप्रेमी, पर्यटक आणि सामान्य जनतेला जयचा विसर पडला नाही. रूबाबदार आणि देखणा जय वाघ बेपत्ता होण्याचे गुढ अद्याप कायम असून वनविभाग, गुप्तचर विभाग आणि राज्य सरकारलाही त्याचा शोध घेता आला नाही. आता उरल्या केवळ जय वाघाच्या आठवणी आणि सुरस कथा.पवनी-कऱ्हांडला अभयारण्याचे आकर्षण ठरलेला जय वाघ १८ एप्रिल २०१६ रोजी अखेरचे दर्शन देवून बेपत्ता झाला. तो कधीच दिसला नाही. जय वाघ गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातून पवनी तालुक्यातील डोंगर महादेव, खापरी, पाऊनगावच्या जंगलात जून २०१३ मध्ये दाखल झाला होता. त्यावेळी तो केवळ अडीच ते तीन वर्षाचा होता. येथील घनदाट विस्तीर्ण जंगलात तो रमला. त्यानंतर या जंगलाचा समावेश उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात करण्यात आला. काही दिवसातच जय या अभयारण्याचा हीरो ठरला. शेकडो पर्यटक जयची एक झलक पाहण्यासाठी येथे येत होते. आॅनलाईन बुकींगही मिळत नव्हते. अनेक जणांना येथे प्रतीक्षेत राहत होते. भारदस्त शरीरयस्टी, देखणेपणा, चेहऱ्याची सुंदरता व विलक्षण चपळाईमुळे त्याने पर्यटकांना भुरळ घातली. या जंगलावर त्याने आपले अधीराज्य निर्माण केले. अनेक वाघांना येथून पळवून लावले. एवढा दरारा जयचा होता. त्याच्यापासून जवळपास २४ छाव्यांना वाघीनींनी जन्म दिला. जय कुणाला घाबरत नव्हता. परंतु त्याने माणसावर कधी हल्ला केला नाही.जून २०१६ मध्ये जय अचानक बेपत्ता झाल्याची माहिती बाहेर येवू लागली. सुरूवातीला वनविभागाने कानावर हात ठेवले. पण थोड्याच दिवसात जय बेपत्ता झाल्याची माहिती वनविभागाला द्यावी लागली. अचानक बेपत्ता झालेला जय शेवटच्या कालावधीत पवनीजवळील बेरावा शिवारात आढळला होता. जयला लावलेल्या आयडीकॉलरची ही अखेरची नोंद ठरली. परंतु नंतर तो कुठे गेला, काय गेला याचा थांगपत्ता लागला नाही.मिशन जय सर्च मोहीम अपयशीवनविभागाने मिशन जय सर्च मोहिमेवर आपले सर्व लक्ष केंद्रीत केले होते. जयचे १८ एप्रिल २०१६ रोजी शेवटचे लोकेशन आढळून आले. विशेष म्हणजे जय आपला नेहमीचा मार्ग सोडून निघाला होता. ज्या शेतात जयच्या पायाचे ठसे आढळून आले, तेथून केवळ २०० फुटावर पवनी-नागपूर हा डांबरी रस्ता आहे. याच दिवशी म्हणजे १८ एप्रिलला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव क्षेत्रातून डोंगरमहादेव परिसरातील जंगलात शेंड्यापिपरी नावाच्या बोडीत डुंबताना पर्यटकांना दिसला होता. त्यानंतर जय कधीच कुणाला आढळला नाही. आता केवळ जयच्या आठवणी उरल्या आहेत. जयची शोध मोहीम वनविभागाने का थांबविली, याचा विचार करण्याचीही गरज आहे.

टॅग्स :Tigerवाघ