शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात मायलेक ठार; पितापुत्र गंभीर जखमी

By admin | Updated: May 27, 2015 00:38 IST

नागपूरहून गोंदियाकडे जाणाऱ्या एका भरधाव कारने रस्त्यात उभ्या ट्रेलरला जोरदार धडक दिली.

मुंडीपार येथील घटना पितापुत्रांवर प्रकृती धोक्याबाहेरलाखनी : नागपूरहून गोंदियाकडे जाणाऱ्या एका भरधाव कारने रस्त्यात उभ्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. त्यानंतर ही कार दुभाजकावर आदळली. यात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील मुंडीपार शिवारात घडली. जखमींवर भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.माया धर्मरक्षित टेंभुर्णे (४५) आणि संदेश धर्मरक्षित टेंभुर्णे (२०) अशी मृतकांची नावे आहेत. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक धर्मरक्षित टेंभुर्णे हे कुटुंबीयांसह कार एमएच ३१ / डीसी २४१ ने नागपूरला गेले होते. सोमवारी रात्री आमगावला परत जात असताना मुंडीपार शिवारात ११.३० च्या सुमारास रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रेलरला कारने धडक दिली. त्यानंतर ही कार दुभाजकावर आदळून घासत गेली. यात कारमधील माया टेंभुर्णे यांचा जागीच मृत्यू झाला. संदेश टेंभुर्णे (२०), धर्मरक्षित टेंभुर्णे (४९) आणि पंकज टेंभुर्णे (१४) हे गंभीररीत्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच लाखनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. दरम्यान, संदेशचा वाटेतच मृत्यू झाला. जखमी पितापुत्रांवर भंडारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. (तालुका प्रतिनिधी)लवारीत अंत्यसंस्कारया अपघातात मृत्यू झालेले माया टेंभुर्णे आणि संदेश टेंभुर्णे यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली. त्यानंतर साकोली तालुक्यातील लवारी या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर झाल्यामुळे काही नातेवाईक रुग्णालयात तर काही अंत्यसंस्कारासाठी गेले होते.