शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

मुस्लीम समाजाला आरक्षण गरजेचे

By admin | Updated: December 3, 2015 00:50 IST

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक मुस्लिमांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असे असतानाच मुस्लीम समाजाला नोकरी, ...

भंडारा : देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक मुस्लिमांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असे असतानाच मुस्लीम समाजाला नोकरी, उच्च शिक्षणात आरक्षणापासून वंचित ठेवण्यात येते. हे चुकीचे आहे. मुस्लीम समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाहीत. त्यामुळे मुस्लीम समाजाला आरक्षण मिळणे गरजे आहे, असे प्रतिपादन मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल जब्बार काझी यांनी केले. मुस्लीम आरक्षण संघर्ष समिती शाखा भंडाऱ्याच्या वतीने येथील मुस्लीम लायब्ररी सभागृहात बुधवारी जिल्हास्तरीय मुस्लीम समाज जनजागृती मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी अ‍ॅड. फरहत बेग, अ‍ॅड. जावेद कुरैशी, आसिफ खान, अलिप पाचोली, आबिद सिद्धीकी, मकसूद पटेल, डॉ. कुतूबुद्दीन अहमद, बशीर पटेल, हाजी सलाम, गफ्फार आकबानी, परवेज पटेल, हाजी कमर रिजवी, अशफाक राजू पटेल, मिर्जा अख्तर बेग, काजी परवेज, हाजी शाहिद परवेज शेख, सैय्यद कासिम अली उपस्थित होते.अब्दुल जब्बार काझी म्हणाले, भारतावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी देशातील थोर समाजसेवक क्रांतीकारी देशभक्तांनी आपल्या रक्तची पाने करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. स्वातंत्र्याच्या लढाईत मुस्लिम समाजाचे अनेक बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खांद्याला खांदा लावून निर्भीडपणे लढणारे, तोफखाना चालविणारे मुस्लीम बांधव होते. स्वातंत्र्यासाठी लढत असणारे टिपू सुलतान हेदेखील मुस्लिमच होते. घरात दारिद्र्य असतानाही देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लीम बांधवांनी प्राणाची आहुती दिली. अ‍ॅड. जावेद म्हणाले, मुस्लीम समाजाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अडचणीचे होत आहे. त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी मुस्लिम समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. अ‍ॅड. फरहद बेग म्हणाले, मुस्लीम समाजाची परिस्थिती लक्षात घेता त्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची आवश्यकता आहे. मेळाव्याचे संचालन अ‍ॅड. सिद्धीकी यांनी केले. प्रास्ताविक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शाहिद अख्तर शेख तर आभार प्रदर्शन सोहेल अहमद यांनी केले. मेळाव्यासाठी रिजवान हसन, समीर नवाज, आदिल सैय्यद, नईम कुरैशी, ईरफान सैय्यद, मतीन शेख, फिरोज नाजीर शेख, मुन्सी मास्टर, सलीम आमिरखान, ईस्माईल खान, दाऊद खान, रिजवान शेख, जलील खान, मन्नु शेख, बाबा पटेल, जावेद पठाण, नसीम खान, आतिक इमरान, असलम खान, कासिफ खान, शाहिद अली, अशफाक पटेल, जमील आमिर व जिल्हा मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)