शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, वादातून घडले हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 22:12 IST

भंडारा : क्षुल्लक कारणावरून घडलेल्या वादात एका ३० वर्षीय तरूणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. धरमपाल रामदास वैद्य असे ...

भंडारा : क्षुल्लक कारणावरून घडलेल्या वादात एका ३० वर्षीय तरूणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. धरमपाल रामदास वैद्य असे मृत तरूणाचे नाव आहे. ही घटना भंडारा शहरातील कस्तुरबा गांधी वॉर्डातील टप्पा मोहल्ल्यात दुपारच्या सुमारास घडली.भंडारा पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून एका आरोपीच्या शोधात नागपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले आहे. रोशन रमेश कटारे व रवी रमेश कटारे अशी भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे आहेत. तर पसार झालेला अनिकेत कोकाटे याच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे. भंडारा बसस्थानकाच्या मागील परिसर टप्पा मोहल्ला म्हणून ओळखला जातो. माहितीनुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास दोन महिलांचा वाद सुरू झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. याचवेळी धारदार शस्त्राने धरमपाल यांच्यावर वार करण्यात आले. गंभीर अवस्थेत धरमपाल याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक लोकेश काणसे यांच्यासह चमूने घटनास्थळी भेट दिली. यात कारवाईची सुत्रे जलद गतीने हाताळून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. वृत्त लिहिपर्यंत भंडारा शहर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांच्यासह पोलीस निरीक्षक व अन्य सहकाºयांची बैठक सुरू होती. पसार झालेल्या आरोपीच्या शोधार्थ पथक पाठविल्याचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांनी सांगितले.

--------खून प्रकरणात आरोपींचा शोध घेवून फौजदारी प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.  -लोकेश काणसे,               पोलीस निरीक्षक भंडारा.