शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षा भाेगून येताच मित्रांच्या मदतीने खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2022 05:00 IST

नेहाल नुकत्याच एका प्रकरणात खुनाची शिक्षा भाेगून आला हाेता. मात्र बंटीसाेबत नेहालचा क्षुल्लक कारणावरून वाद पराकाेटीला गेला हाेता. बंटी नेहालला नेहमी धमकवत हाेता, त्यामुळे आपला जीव जाईल या भीतीतून त्याने शिक्षा भाेगून येताच खुनाचा कट रचला. त्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दाेघांना साेबत घेतले आणि गणेशनगरीजवळ शनिवारी खून केला. या प्रकरणात वरठीचे ठाणेदार निशांत मेश्राम यांनी तिघांनाही शुक्रवारी रात्री अटक केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कवरठी : घरफाेडी प्रकरणात शिक्षा भाेगून येताच मित्राच्या मदतीने रेती व्यावसायिकाचा खून केला. वारंवार हाेणारे वाद आणि त्यातून जिवाची भीती यामुळे मित्राच्या मदतीने धारदार शस्त्राने सपासप २६ वार करून खून केल्याचे पाेलीस तपासात पुढे आले आहे. विशेष म्हणजे मृतक आणि मुख्य आराेपीत घनिष्ठ मैत्रीही हाेती. खुनाची ही घटना भंडारा- वरठी मार्गावर गणेश नगरीसमाेर शुक्रवारी सकाळी घडली हाेती.राहूल उर्फ बंटी लालचंद जयस्वाल (३०) रा. टाकळी असे मृताचे नाव असून ताे मूळचा उत्तरप्रदेशातील गाैरखपूर येथील रहिवासी आहे. ताे गत अनेक वर्षांपासून भंडाराजवळील टाकळी येथे राहत हाेता. त्याच्याकडे ट्रॅक्टर असून ताे रेतीचा व्यवसाय करीत हाेता. नेहाल अण्णाजी राऊत (२५), अमित उर्फ कचरा सुधाकर चाेपकर, विश्वा उर्फ बग्गा रामकृष्ण गाते (१९)  अशी आराेपींची  नावे असून ते कुख्यात गुन्हेगार आहेत. मुख्य आराेपी नेहाल राऊत हा अट्टल घरफाेड्या असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. कचरू चाेपकरवरही गुन्हे दाखल असून बग्गा गाते याच्यावर खुनाचा गुन्हा आहे.नेहाल नुकत्याच एका प्रकरणात खुनाची शिक्षा भाेगून आला हाेता. मात्र बंटीसाेबत नेहालचा क्षुल्लक कारणावरून वाद पराकाेटीला गेला हाेता. बंटी नेहालला नेहमी धमकवत हाेता, त्यामुळे आपला जीव जाईल या भीतीतून त्याने शिक्षा भाेगून येताच खुनाचा कट रचला. त्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दाेघांना साेबत घेतले आणि गणेशनगरीजवळ शनिवारी खून केला. या प्रकरणात वरठीचे ठाणेदार निशांत मेश्राम यांनी तिघांनाही शुक्रवारी रात्री अटक केली. शनिवारी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली. अधिक तपास जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार मेश्राम करीत आहेत.

बंटी आणि नेहाल यांची हाेती घट्ट मैत्री- मृतक बंटी जयस्वाल आणि या प्रकरणातील मुख्य आराेपी नेहाल राऊत यांच्यात घट्ट मैत्री हाेती. दाेघात चांगला घराेबा हाेता. नेहालची बंटीच्या घरी नेहमी ये-जा असे. परिवारातील सदस्यांसाेबतही चांगली गट्टी जमली हाेती. दाेघात आर्थिक देवाण-घेवााण हाेत हाेती. - गत आठवड्यात तुमसर येथे एका हाॅटेलसमाेर तरुणाचा तब्बल २६ वार करुन खून करण्याची घटना घडली हाेती. या घटनेचा व्हिडीओ साेशल मीडियावर वायरल झाला हाेता. या घटनेची शाई वाळत नाही ताेच पुन्हा गणेशनगरी जवळ रेती व्यवसायीकाचा २६ वार करुन  खून करण्यात आला.

खून पुर्वनियाेजित- बंटी जयस्वाल याचा खून पुर्व नियाेजित असल्याचे पाेलीस तपसाात पुढे आले आहे. वादातून आपला जीव जाईल या भीतीने नेहाल राऊतने बंटीचा खून करण्याचे ठरविले हाेते. गुरुवारी रात्रभर दारु प्राशन करुन खुनाचा सापळा रचला. गणेशनगरीजवळ सकाळी बंटी येताच त्याच्या डाेळ्यात मिरची पावडर फेकली आणि धारदार शस्त्राने वार केला. बंटी हा आपल्या तिघांनाही भारी पटेल म्हणून प्रथम  डाेळ्यात मिरची पावडर फेकून खुन केला. भर रस्त्यावर ही घटना घडली. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी