शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

तुमसर रेल्वेस्थानकातील समस्यांचा खासदारांकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील जुन्या असलेल्या तुमसर रेल्वेस्थानकात बऱ्याच समस्या आहेत. त्या सोडविण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाली. रेल्वेस्थानकाच्या बाजूला समांतर रोड तयार करण्यात यावा, असा विषय चर्चेत आल्यानंतर त्या अनुषंगाने खासदार यांनी अधिका-यांना निर्देश दिले. तुमसर शहर स्थानक ते रामटेकपर्यंत रेल्वेमार्ग टाकण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात यावी, असेही खासदारांनी सांगितले.

ठळक मुद्देप्रलंबित असलेली मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम करण्याचे दिले निर्देश

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तुमसर रेल्वेस्थानकावरील अडीअडचणी जाणून घेण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी आज तुमसर रेल्वेस्थानकात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी रेल्वेचे अधिकारी आणि स्टेशन समितीचे सदस्य उपस्थित होते.जिल्ह्यातील जुन्या असलेल्या तुमसर रेल्वेस्थानकात बऱ्याच समस्या आहेत. त्या सोडविण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाली. रेल्वेस्थानकाच्या बाजूला समांतर रोड तयार करण्यात यावा, असा विषय चर्चेत आल्यानंतर त्या अनुषंगाने खासदार यांनी अधिका-यांना निर्देश दिले. तुमसर शहर स्थानक ते रामटेकपर्यंत रेल्वेमार्ग टाकण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात यावी, असेही खासदारांनी सांगितले. रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या बसस्थानकाची नियमित स्वच्छता व्हावी, रेल्वेस्थानकाजवळ नवीन तिकीटघर आणि प्रवाशांसाठी शेड उभारण्यात यावे, मागील अनेक वर्षांपासून स्टेशनच्या बाहेरपर्यंत फूट ओहर ब्रीजची मागणी करण्यात येत आहे. प्रलंबित असलेली ही मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम करण्यात यावे, असे निर्देशही या बैठकीत खासदार मेंढे यांनी दिले. या रेल्वेस्थानकावरून शेकडो प्रवासी नियमित प्रवास करतात, त्यामुळे रेल्वेस्थानकाची स्वच्छता आणि प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याकडे काटेकोरपणे लक्ष देण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. याप्रसंगी नगराध्यक्ष  प्रदीप पडोळे, मुन्ना पुंडे, सरपंच  रिताताई मसरके,  सुनील पारधी, आशीष कुकडे,  राजाभाऊ लांजेवार,  कल्याणी भुरे, संतोष वहिले,  सुनील दमाहे,  नानू बिरणवार,  सुरेंद्र सव्वालाखे व आदी मान्यवर उपस्थित होते.

 

टॅग्स :railwayरेल्वे