शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
2
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
3
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
4
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
5
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
6
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
7
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
8
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
9
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
10
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
12
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
13
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
14
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
15
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
16
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
17
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
18
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
19
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
20
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
Daily Top 2Weekly Top 5

लेक वाचवा कार्यक्रमात मातांचा हृदयस्पर्शी संवाद सोहळा

By admin | Updated: January 28, 2017 00:36 IST

मोठेपणा मिळवून दिल्याचे सुख, आर्इंच्या डोळ्यात तरळणारे आनंदाश्रू असा दुर्मिळ योग लेकींच्या कतृत्वाने आईला मिळवता आला.

कर्तृत्ववान माय-लेकींचा सत्कार : मातांना मिळाले व्यासपीठ, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलचा पुढाकार मोहाडी : मोठेपणा मिळवून दिल्याचे सुख, आर्इंच्या डोळ्यात तरळणारे आनंदाश्रू असा दुर्मिळ योग लेकींच्या कतृत्वाने आईला मिळवता आला. बौद्धीक श्रमाने स्वबळावर लेकिने स्वत:चे अस्तित्व निर्माण केल्यानंतर आर्इंसह लेकिंचा सत्कार करण्यात आला. या दुर्मिळ योग साधला मोहगांव देवी येथील महात्मा ज्योतीबा फुले हायस्कूल येथे. यासोबतच माता पालक संवाद विलक्षण अन् हृदयस्पर्शी सोहळा अनेक मातांना अनुभवता आला.‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकवा’ अभियान उपक्रमांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी येथे आदर्श मातांचा सत्कार, माता-पालकांचा संवाद, मुलींचे शिक्षणात महत्व या विषयावर चर्चा, उपस्थित मातांसाठी महिलापयोगी वस्तूंचे बक्षिस व हळदीकुंकूचा असा विविधांगी कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष स्वाती हटवार होत्या. उद्घाटन पंचायत समिती सदस्य अश्वनिता लेंडे यांनी केले. व्यासपीठावर शारदा शांडिल्य, भारती तितिरमारे, राजश्री लेंडे, वनिता ईश्वरकर, योगिता नागपुरे, सरला साखरवाडे, अनिता काळे, माधुरी लेंडे, कुंदा ईश्वरकर, नंदा टिचकुले, रंजू टिचकुले, हेमलता पोटफोडे, प्रियंका लांबट, उर्मिला साखरवाडे, कुसूम पंधरे, ललिता चोपकर, मनिषा पंधरे, गीता भडके, लक्ष्मी उपरीकर, वंदना शहारे, हर्षा भुरे, सविता आंबिलकर, संगिता लेंडे, माधुरी लांजेवार, पल्लवी काळे, जयश्री शहारे, कांता पडोळे, वर्षा ढोमणे, शोभा कोचे यांची उपस्थिती होती.प्रास्ताविकातून मुख्याध्यापक राजकुमार बांते यांनी, शिक्षणात लेकिचे महत्व व आर्इंची भूमिका कशी असायला पाहिजे, तसेच लेकींच्या कतृत्वाला पे्रेरणा आर्इंना मिळावी, मातांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी माता पालक संवाद मेळावा आयोजित केल्याचे सांगितले. आर्इंचा त्याग अन् लेकिची धडपड, मेहनत यातून काही माजी विद्यार्थीनींनी कर्तृत्व सिद्ध करीत नोकरी मिळविली त्या लेकींचा आर्इंसह सत्कार करण्यात आला. यात जयश्री वैद्य, गीता शेंडे, भावना शहारे या माजी विद्यार्थीनींचा समावेश आहे. सत्कारात भावना शहारे म्हणाली, मुलींना शिकवा, तिला साथ द्या, स्वबळावर लेक उभी होईपर्यंत तिच्या पाठीशी राहा. यावेळी मार्च २०१६ च्या शाळांत परीक्षेत गुणवंत ठरलेला महात्मा ज्योतिबा शाळेचा विद्यार्थी अनिकेत फुलबांधे याचा पंचायत समिती सदस्य अश्वनिता लेंडे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थीनींची माता प्रतिकृल परिस्थिती आपल्या लेकिंना शिकवित असल्याबद्दल माधुरी बुराडे, रेखा जगनाडे, छाया बंसोड व स्वाती हटवार या धैर्यवान आर्इंचा आदर्श माता म्हणून सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित आई व लेकींचा संवाद मुख्याध्यापक यांनी घडवून आणला. आई व मुलींचे काय शिक्षणाविषयी काय स्वप्न आहेत. यासाठी आई-मुलीचे नियोजन काय राहिल हे आई-मुलींच्या संवादातून स्पष्ट झाले. विलक्षण अशा ऐतिहासिक मेळाव्यात मातांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी उपस्थित मातांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून साडी, बेडशिट व हॉटपॉटचे बक्षीस ३२ मातांना वितरीत करण्यात आले. यावेळी मंचावर उपस्थित असल्यापैकी भारती तितिरमारे यांनी आता वंशाचा दिवा म्हणून मिरवू नका. मातांनी स्वत:ला जीजामाता निर्माण केले पाहिजे. झाशिची राणी, शिवाजी घडविण्याची ताकत मातांमध्ये आहे. त्यासाठी विचार प्रगल्भ करून आर्इंनी स्वत:ची ओळख, अस्तित्व निर्माण केले पाहिजे. अश्वनिता लेंडे, अनिता काळे, योगिता नागपूरे, पल्लवी काळे, गीता भडके, कला मलेवार, शारदा शांडिल्य यांनी आपले विचार प्रगट केले. एक तरी मुलगी असावी ही कविता भारती तितिरमारे यांनी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. अध्यक्षीय भाषणातून स्वाती हटवार म्हणाल्या. पतीच्या निधनानंतर लेकींना शिक्षण देणे ही आईची कसोटी असते. त्या कसोटीतून जाताना मुलींना उणीव भासू देवू नका, तिला शिकवा असे त्यांनी भावनिक साद घातली. कार्यक्रमाचे संचालन वर्षा ढोमणे, हेमराज राऊत यांनी तर आभारप्रदर्शन हंसराज भडके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यास धनराज वैद्य, गजानन वैद्य, मोहन वाघमारे, श्रीहरी पडोळे व शाळेतील विद्यार्थीनींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी) लेकींच्या कर्तृत्वाने माता भारावल्यालेकीने अस्तित्व निर्माण करून आर्इंला सत्काराच्या सन्मानापर्यंत नेलं याचा अभियान उपस्थित प्रत्येक मातांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सत्काराच्या वेळी त्या मातांचे डोळे पाणावले होते. या क्षणाच्या साक्षीदार बनलेल्या उपस्थित मातांचे मन भारावून गेले होते. या आगळ्यावेगळ्या सत्कार सोहळ्याने भारावलेल्या माता निश:ब्द झाल्या होत्या. मुलीला जन्म देऊन त्यांचे जीवन सार्थकी झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. भावनिक कार्यक्रमाने एक वेगळे समाधान दिसत असले तरी काही क्षण शांतता पसरली होती, हेच या कार्यक्रमाचे खरे गमक ठरले.आनंदाच वाण...संक्रांतीच्या आनंदी आणि गोड पर्वात मनाला काही गोष्टी खटकतात. विधवांचा या सणात आनंद नाकारला जातो. संक्रांत, हळदीकुंकू हा सवाष्णीचा सण ओळखला जातो पण, शाळेच्या वतीन हळदीकुंकू या कार्यक्रमात विधवा मातांना त्या मानानं व आनंदान गोडव्याची पेरणी करण्यात आली. कोणताही भेदभाव न करता हळदी व वाण देवून प्रसन्न वातावरणाची उधळण झाली. यावेळी विधवा आर्इंच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू लाख मोलाच दिसून आलं.