शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

घडाईपेक्षा मढाईच अधिक

By admin | Updated: November 24, 2015 00:39 IST

अड्याळमध्ये कधी नव्हे इतक्या प्रमाणात धान पिकावर किडीने आक्रमण केले.

व्यथा शेतकऱ्यांची : बळीराजा सापडला आर्थिक संकटात विशाल रणदिवेअड्याळअड्याळमध्ये कधी नव्हे इतक्या प्रमाणात धान पिकावर किडीने आक्रमण केले. हातचे पिक जाऊ नये, यासाठी येथील शेतकऱ्यांनी तन मन धन पणाला लावले तरीही पालथ्या घागरीवर पाणी पडल्यासारखे शेवटी डोळ्यात भरणारे पिक अश्रू देऊन गेला. अड्याळमध्ये कुणाला एकरी २ पोते, ५ पोते आलेच तरी सुधारित पैसेवारी ६५ पैसे दाखविली आहे. ५० टक्क्यापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यांना दुष्काळाचे लाभ देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त यादीतून बेपत्ता आहे. अड्याळ गावाची सुधारित पैसेवारी ६५ ठळक अक्षरात दाखविली आहे. पैसेवारीचे आकडे गावातील पिक परिस्थिती समाधानकारक असल्याचे सांगत असले तरी वास्तव मात्र वेगळेच आहे. आजही आणेवारी काढण्याची पद्धत जुनीच आहे. त्यामुळे खरे चित्र कागदावर दिसत नाही. अड्याळमध्ये दर्शविलेल्या पैसेवारीनुसार पिकपरिस्थितीनुसार शेतकऱ्यांची ओरड सुरूच आहे परंतु या हाकेला धावणारे नेतृत्व करणारे उपलब्ध होत नसल्याने येथील शेतकरी नुसता गरजत आहे परंतु बरसला नाही. पिक परिस्थिती समाधानकारक असती तर एवढी ओरड खरचं असती का त्यामुळे सरकारी यंत्रणा खरच किती गंभीर आहे यावरून लक्षात येते.धान उत्पादकांचा खंबीर वालीच शोधूनही सापडत नसल्यामुळे येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध सोयी सवलती पदरात पाडून धानाला उत्पादन खचाृवर आधारित भाव मिळण्यासाठी शासनदरबारी भांडणाच्या दमदार नेतृत्वाची आज गरज आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्ष नेते मंडळींनी शेतकरी हिताची ग्वाही दिली. आज इथे यायला शेतकऱ्यांची अवस्था जाणून घ्यायलाही या लोकप्रतिनिधींकडे वेळ नाही. किडीने शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावला आहे. कधी ओला तर कधी कोरडा, रोगराई आणि सिंचनाची सोय नसल्याने अनेकदा शेतकऱ्यांना पिक घेताना सामोरे जावे लागत आहे. यावर शासनाने वेळीच उपाययोजना करून त्यांना आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.