शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर तालुक्यात परप्रांतातून मोहफुलाची खुलेआम तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:42 IST

मध्यप्रदेशातून तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोहफुलाची तस्करी केली जात आहे. नदी तीरावरील गावे तस्करीचे मुख्य केंद्र झाले आहेत. आंतरराज्यीय मोहफुल वाहतूकीला बंदी असताना ट्रकच्या माध्यमातून मोहफुलाची खेप येथे पोहचते.

ठळक मुद्देमध्यप्रदेशातून आयात : नदीतीरावरील गावे तस्करीचे केंद्र, राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मध्यप्रदेशातून तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोहफुलाची तस्करी केली जात आहे. नदी तीरावरील गावे तस्करीचे मुख्य केंद्र झाले आहेत. आंतरराज्यीय मोहफुल वाहतूकीला बंदी असताना ट्रकच्या माध्यमातून मोहफुलाची खेप येथे पोहचते. उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यंत्रणा येथे गाफील दिसत आहे.तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावरुन मध्यप्रदेश राज्याची सिमा सुरु होते. मध्यप्रदेशातील वाराशिवनी, कटंगी, बालाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात मोहफुलाची झाडे आहेत. मोहफुल अधिकृत विक्रेत्यांची संख्या अगदी कमी आहे. मोहफुलाचा केवळ औषधोपयोगी कामाचा वापर करता येतो. परंतु येथे मोहफुलांची दारु गाळप करण्याकरिता मोहफुलांचा सर्रास उपयोग केला जात आहे. मध्यप्रदेशात कमी किंमतीत मोहफुल खरेदी करुन ते महाराष्टÑाच्या सीमेतील तुमसर तालुक्यात ट्रकमध्ये भरुन आणले जात आहे. वैनगंगा नदी तीरावरील गावात सदर ट्रक एक दिवसाआड येत असून हा प्रकार अनेक महिन्यांपासून सुरु आहे.बपेरा येथे नाकाडोंगरी मार्गाने मोहफुलाचा ट्रक तुमसर तालुक्यात प्रवेश करीत असल्याची माहिती आहे. तुमसर तालुका व मोहाडी तालुक्याच्या सीमेतील तुमसर-गोंदिया राष्टÑीय महामार्गाजवळील वैनगंगा नदी तीरावरील गावात मोहफुलाचा ट्रक रिकामा केला जात आहे. मोहफुल खरेदी करणारे तेथून मोहफुलाची चिल्लर विक्री करीत आहेत. काहींना मोहफुल दारु गाळप केंद्रापर्यंत मोहफुल पोहचवून देण्यात येत आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यात मोहफुल गाळप केंद्र व दारुची दुकाने गावागावात सुरु आहेत मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही.वाहतुकीला बंदीकेवळ अधिकृत मोहफुल केंद्रावरच मोहफुल विक्री करता येते. त्यामुळे अधिकृत मोहफुल विक्रेत्यांकडेच मोहफुलाचा ट्रक जाऊ शकतो. इतर मोहफुल अनधिकृत खरेदीदारांकडे मोहफुल विक्री करता येत नाही. आंतरराज्यीय मोहफुल वाहतूक व विक्रीला सुध्दा बंदी आहे. परंतु तुमसर तालुक्यात मात्र रोजरोसपणे मोहफुलाचा ट्रक प्रवेश करीत आहे. नेमके हे मोहफुल कुठून येते याचा शोध अजूनपर्यंत संबंधित विभागाने लावला नाही. यातच खरे कारण दडले आहे.गावठी दारु विक्रीला पोलिसांचा आशीर्वादतुमसर व मोहाडी तालुक्यातील बऱ्याच गावात सर्रास गावठी दारुचा व्यवसाय फोफावला आहे. स्वस्त व गावात सहज उपलब्ध होत असल्याने कष्टकरी, मजूरवर्ग मोहफुलापासून तयार होणारी गावठी दारु प्राशन करीत आहे. मोहफुल गाळप केंद्रावर रासायनीक पदार्थांचा उपयोग मोहफुल सडविण्याकरिता केला जातो. हा प्रकार आरोग्यास अपायकारक आहे. मोहफुल दारु विक्रीला निश्चितच पोलिसांचा आशीर्वाद आहे. अर्थकारणामुळे सदर व्यवसाय फोफावण्यास मदत मिळाली आहे.मंगळवारी एका गावात तीन पोलीस एका दारु विक्री केंद्रावर धाड टाकण्याकरिता गेले होते. त्यांनी एका गृहस्थाला पोलिसी खाक्या दाखवून त्याचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक मागितला. संबंधित पोलीस कशाकरिता आले होते. त्या दारु विक्री करणाºयावर कारवाई केली काय? हे अनुत्तरीत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. सुज्ञ नागरिक हे उघड्या डोळ्यांनी बघतो, परंतु उगाच भानगडीत पडण्यापासून ते दुर राहतात. यामुळे दारू विक्रेत्यांचे चांगलेच फावत आहे. पोलीस या प्रकाराला बगल देत असल्याने दारू विक्रीचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे.