शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

मोहाडीत राज्यस्तरीय राष्ट्रसंत युवा साहित्य संमेलन आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:33 IST

श्रीगुरूदेव सेवा मंडळातर्फे ३ रे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवा साहित्य संमेलन १२ नोव्हेंबरला माता चौंडेश्वरी मंदिर परिसर, मोहाडी येथे आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देउद्घाटनाला येणार वनमंत्री : चौंडेश्वरी मंदिर प्रांगणात आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : श्रीगुरूदेव सेवा मंडळातर्फे ३ रे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवा साहित्य संमेलन १२ नोव्हेंबरला माता चौंडेश्वरी मंदिर परिसर, मोहाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मोहाडी गावाला प्रथमच आयोजनाचा मान मिळाला असून हे संमेलन यशस्विरित्या संपन्न व्हावे, यासाठी आयोजकांची जय्यत तयारी झाली आहे.देशातील युवक हा राष्ट्राचा आधारस्तंभ असून, राष्ट्रसंतांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी या संमेलनाचे प्रयोजन आहे. ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, विशेषांक प्रकाशन, समूहगान, सामाजिक ग्रामोत्थान चळवळ, समाजप्रबोधन, महिलोन्नती, युवा जागृती व कृषी संदेश अशा विविध विषयांचा परिसंवादात समावेश आहे.१२ नोव्हेंबरला सकाळी ५.३० ला प्रभाकर पराते यांच्या उपस्थितीत सामुदायिक ध्यान व चिंतन ६.३० वाजता बाळूभाऊ बारई यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. ६.४५ ला ग्रंथदिंडी काढण्यात येईल. नरेश दिपटे, आशिष पात्रे, प्रेमरतन दमानी यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात येईल. ९.३० ला आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते राष्ट्रसंतांच्या छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन होईल.संमेलनाचा उद्घाटन सोहळा सकाळी १०.३० वाजता सुरू होईल. उद्घाटक वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील. संमेलनाध्यक्षपद गुरूकुंज मोझरीचे डॉ. प्रा. भास्करराव विघे भूषवतील. स्वागताध्यक्ष ग्रामगीता स्फूर्ती सेवाश्रमचे अध्यक्ष गौरीशंकर नागफासे, रातुम नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, भूदान यज्ञ मंडळाचे अध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरूळकर, खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित राहतील. विशेष पाहुणे ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी, डॉ. राजाराम बोथे, चित्रकार प्रदीप पवार, ज्येष्ठ पत्रकार गजानन निमदेव, नगराध्यक्ष स्वामी निमजे, गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष केशवराव निर्वाण, लायन्स क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. विनोद भोले उपस्थित राहतील.त्यानंतर क्रमश: निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ती कराने, आजच्या आधुनिक काळात शेतकºयांच्या उत्थानासाठी ग्रामगितेची गरज, राष्ट्रसंतांच्या युवा क्रांतीची दिशा या विषयावर तीन परिसंवाद होतील. या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीचे नलिनी कोरडे, चंद्रकांत बोरकर, सुशील बुरडे, नारायण धकाते यांनी केले आहे.