शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

मोहाडीची जागृत देवी ‘माता चौंडेश्वरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2015 01:07 IST

लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेली मोहाडीची जागृतदेवी माता चौंडेश्वरी देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे.

नवरात्रौत्सव : १,३०० ज्योतिकलशाची स्थापनाराजू बांते मोहाडी लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेली मोहाडीची जागृतदेवी माता चौंडेश्वरी देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. चौंडेश्वरी मातेच्या मंदिरात मंगलमय वातावरणात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. माता चौंडेश्वरी देवीचे मंदिर आहे. त्याचा ६०० वर्षाचा इतिहास असल्याचे सांगण्यात येते. मंदिराच्या ठिकाणी पूर्वी घनदाट जंगल होते. वृक्षवेलींनी नटलेल्या टेकडीला वेढा घालत जाणारी गायमुख नदी तपोवनात शांत व निसर्गरम्य असा त्या परिसरात श्री संत नारायण स्वामी यांनी मुक्काम केला होता. त्या काळात वाहतूक मार्ग व रस्ते नसल्याने तो परिसर दुर्गम होता. गावात समृद्धी, शांती नांदावी यासाठी महाचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. संत नारायण स्वामींनी मनोमकामना पूर्ण करण्यासाठी यज्ञ केले होते. महायज्ञाच्या आवर्तनासाठी असलेले साहित्य संपले. यज्ञाच्या बाजूला ठेवलेले ऋग्वेद, यजुर्वेद, अर्थवेद व सामवेदाचे एक एक पान हवनकुंडात सोडत असताना महाकाय माँ चौंडेश्वरीचा रुप बाहेर आला. माँ चौंडेश्वरी म्हणाली, ‘आपने जो महाचंडी महायज्ञ हवनकुंड में किया, सच्चे मन से साधना की, चार वेद छोडे, उसकी शक्ती बनकर मैं प्रगट हुई हूं, आप मुझे माँ चौंडेश्वरी कह सकते है. जो भक्त मेरी सच्चे मन से साधना करेगा मैं उसकी मनोकामना पुर्ण करुंगी, मेरा आशीर्वाद आदी अनादिकाल तक रहेगा’ असे म्हणून माता अंतर्मुख झाली अशी आख्यायिका आहे. कालांतराने स्वयंभू प्रगट झालेली माता चौंडेश्वरी या नावाने मोहाडीत मंदिर तयार झाले. माँ चौंडेश्वरी देवी मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अनेक वर्ष माँ चौंडेश्वरी देवीची मूर्ती बाहेरच एका ओट्यावरच्या हवनकुंडात स्थापली होती. श्री संत नारायण स्वामी मातेची देखभाल करीत होते. नारायण स्वामीच्या निधनानंतर त्याचे कुटुंबिय देखभाल करायचे. दोन दशकापासून देवीच्या मंदिरात यात्रा भरते. दूरवरचे भाविक श्रद्धेने येतात. मंदिरातील आत व बाहेरचे सौंदर्यीकरणाचे काम सुरु आहे. अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. दूरवरून येणाऱ्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय करण्यात आली आहे. नवरात्रभर दूरवरून येणारे भाविक मोठ्या श्रद्धेने महाप्रसादाचे वाटप करतात. नवरात्र उत्सवासाठी दुकाने थाटण्याचे काम सुरु आहे. नवरात्रोत्सवासाठी विनोद पात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली घट देखरेख समिती, स्वागत समिती, निधी संकलन समिती, पूजा समिती, प्रसाद वाटप आदी समित्या तयार करण्यात आल्या आहेत. आजीवन घट ८० तसेच आतापर्यंत ११०० ज्योतीकलशाची नोंदणी करण्यात आली आहे. १३०० च्या वर ज्योतीकलशाची नोंदणी होण्याची शक्यता असल्याचे चौंडेश्वरी ट्रस्टचे संचालक एकानंद समरीत यांनी सांगितले. नवरात्रभर आरती पहाटे ५.१५ व सायंकाळी ६ वाजता वेळेवर केली जाणार आहे. १३ आॅक्टोबर रोजी सकाळी ११.१५ वाजता ज्योतीकलशाचे दीप प्रज्वलन केले जाईल. २२ आॅक्टोबर रोजी सकाळच्या आरतीनंतर घटांचे विसर्जन केले जाणार आहे.