शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी केली शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 22:45 IST

मागील लोकसभा पोटनिवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज केली. सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांची अवस्था दयनीय केली. कोणत्याही शेतमालाला भाव नाही. त्यामुळे अधिक उत्पन्न मिळवूनही शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे.

ठळक मुद्देराजू शेट्टी : साकोलीत शेतकरी संघटनेची एल्गार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : मागील लोकसभा पोटनिवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज केली. सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांची अवस्था दयनीय केली. कोणत्याही शेतमालाला भाव नाही. त्यामुळे अधिक उत्पन्न मिळवूनही शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. याला मोदी सरकार जबाबदार आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केला.स्थानिक होमगार्ड परेड ग्राऊंडवर शेतकरी संघटनेच्या एल्गार सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर शेतकरी संघटनेचे नेते चंद्रकांत वानखडे, गजानन अहमदाबादकर, उत्तमराव पोपळे, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार, अ‍ॅड.जांभुळे, सुशिला मोराडे, माजी आमदार सेवक वाघाये, सदाशिव वलथरे, अविनाश ब्राम्हणकर, मदन रामटेके, जि.प. सदस्य होमराज कापगते, अशोक कापगते, प्रभाकर सपाटे, प्रदीप मासूरकर, देवानंद पवार, विनोद पटोले उपस्थित होते.यावेळी खा.शेट्टी म्हणाले, मोदींनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवित सत्तेवर आले आणि शेतकºयांसह सर्वसामान्यांची पिळवणूक करीत आहेत. नोटबंदी करून लोकांना रांगेत उभे केले. निरव मोदी व विजय माल्ल्यासारख्या कर्ज बुडव्यांवर कारवाई केली नाही. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे.पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. मागीलवर्षी पाकीस्तानातून कांदा आयात केला व यावर्षी साखर. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना संपविण्याचे काम मोदी सरकार करीत असल्याची टिकाही त्यांनी केली. प्रास्ताविक प्रशांत पवार यांनी केले.संचालन जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते यांनी तर आभारप्रदर्शन शेतकरी संघटनेचे अंतराम खोटेले यांनी केले. कार्यक्रमाला हेमकृष्ण वाडीभस्मे, उमेश भुरे, सुरेशसिंह बघेले, विनायक देशमुख, दिलीप मासूरकर, जया भुरे, ओम गायकवाड, विष्णू रणदिवे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.