शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

आयएफसीमध्ये अडले 1,440 शेतकऱ्यांचे चुकारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 05:00 IST

राज्य शासनाने खरीप धानासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने ७०० रुपयांच्या बोनसची घोषणा केली होती. महिनाभरापूर्वी त्यापैकी ५० टक्के रक्कम, तसेच उन्हाळी धानाचे चुकारे सर्व बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले; परंतु पालोरा येथील अलाहाबाद बँक व मोहाडीतील देना बँकेतील खातेधारक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही जमा झालेली नाही. अलाहाबाद बँक व देना बँकेचे विलीकरण होऊन वर्षभराचा कालावधी लोटला आहे.

ठळक मुद्देबोनस व उन्हाळी धानाची रक्कम : अलाहाबाद व देना बँकेतील शेतकऱ्यांत असंतोष, बँक विलीनीकरणाचा घोळ

युवराज गोमासेलोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : आर्थिक वर्षभरापूर्वी डबघाईमुळे अलाहाबाद बँक (इंडियन बँक) व देना (बँक ऑफ बडोदा) बँकेचे विलीनीकरण झाले. दोन महिन्यांपूर्वी दोन्ही बँकांमध्ये उन्हाळी धानाचे चुकारे व बोनस रक्कम प्राप्त झाली; परंतु मोहाडी तालुक्यातील दोन्ही बँकांच्या शाखांनी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यांचे आयएफसी कोड बदलविले नाहीत. परिणामी, बोनसची व उन्हाळी धानाची रक्कम १,४४० शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. बँकेचे अधिकारी म्हणतात, संबंधितांनी नवे कोड टाकून परत यादी पाठविली पाहिजे, तर संस्था म्हणतात, ही जबाबदारी बँकेची आहे. या घोळात पैसा अडल्याने शेतकऱ्यांत असंतोषाची भावना आहे. राज्य शासनाने खरीप धानासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने ७०० रुपयांच्या बोनसची घोषणा केली होती. महिनाभरापूर्वी त्यापैकी ५० टक्के रक्कम, तसेच उन्हाळी धानाचे चुकारे सर्व बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले; परंतु पालोरा येथील अलाहाबाद बँक व मोहाडीतील देना बँकेतील खातेधारक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही जमा झालेली नाही. अलाहाबाद बँक व देना बँकेचे विलीकरण होऊन वर्षभराचा कालावधी लोटला आहे. मात्र, खातेधारकांसाठी लागू केलेले नवे आयएफसी कोड बँकांनी बदलविले नसल्याने हा घोळ निर्माण झालेला आहे. अलाहाबाट व देना बँकांनी आयएफसी कोडमध्ये त्वरित बदल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा तालुका खरेदी- विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष माधवराव बांते, पालोराचे सरपंच महादेव बुरडे, करडीचे ग्रेडर तितिरमारे यांनी दिला आहे.

१,०६२ शेतकऱ्यांचा अडला बोनस- बोनसची रक्कम अडलेल्या धान खरेदी केंद्रामध्ये मोहाडी तालुका खरेदी- विक्री सहकारी संस्थेच्या वतीने संचालित मोहाडी येथील ७० शेतकऱ्यांचे ८ लाख ६३ हजार १७० रुपये, मोहगाव देवी येथील १४ शेतकऱ्यांचे १ लाख ६९ हजार ४०० रुपये देना बँकेत, तर पालोरा धान खरेदी केंद्रातील ५०३ शेतकऱ्यांचे ३९ लाख एक हजार ९०५ रुपये अलाहाबाद बँकेत अडकले आहेत, तसेच डोंगरदेव धान खरेदी केंद्रातील ३३८ व करडी येथील १४७ शेतकऱ्यांची बोनसची रक्कम प्राप्त झालेली नाही.

३७८ शेतकऱ्यांचे अडकले उन्हाळी चुकारे- डोंगरदेव धान खरेदी केंद्रातील ३४५ व करडी केंद्रातील ३३ शेतकऱ्यांचे उन्हाळी धानाचे चुकारे पालोरा येथील अलाहाबाद बँकेत अडकले आहेत. शेतकरी वारंवार चुकाऱ्यासाठी बँकांच्या चकरा मारत आहेत. खरीप हंगामातील रोवण्यांना प्रारंभ झाला आहे; परंतु अद्यापही शेतकऱ्यांना बोनस व उन्हाळी धानाची रक्कम प्राप्त झालेली नाही. दोन्ही बँकांच्या निष्काळजीपणाचा फटका शेतकऱ्यांसह संस्थांना सहन करावा लागतो आहे. आता आयएफसी कोड केव्हा बदलवितात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आयएफसी कोड बदलाची माहिती संबंधित संस्थांना दिली आहे. त्यांनी खातेधारक शेतकऱ्यांचे कोड बदलविलेली यादी नव्याने पाठवायला हवी. बँकेचे काम फक्त खातेधारकांच्या खात्यात पैसा जमा करण्यापुरते आहे.-हर्षल महादुले, व्यवस्थापक इंडियन बँक शाखा, पालोरा

 

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी