शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष देऊन गंडविले

By admin | Updated: July 19, 2015 00:49 IST

येथील नतून महाराष्ट्र विद्यालयात शिक्षकाची नोकरी देण्याचे आमिष देऊन पाच लाख रूपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार ..

मारण्याची धमकी : पोलिसात तक्र ार देऊनही कारवाई नाहीभंडारा : येथील नतून महाराष्ट्र विद्यालयात शिक्षकाची नोकरी देण्याचे आमिष देऊन पाच लाख रूपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार भंडारा पोलीस ठाण्यात केली. परंतु, पोलिसांनी अद्याप कारवाई केली नाही. संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी टिकाराम बांते यांनी केली आहे.लाखनी तालुक्यातील लाखोरी येथील टिकाराम बांते यांनी मुलगा प्रसाद बांते यांच्या नोकरीसाठी ८ आॅक्टोबर २०११ रोजी नूतन महाराष्ट्र विद्यालयाचे सचिव रविंद्र भालेराव यांना भेटले. त्यावेळी माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरी लावून देतो, फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला नोकरीचे आदेश मिळेल, असे आश्वासन देऊन ५ लाख रूपये मागितले. मुलगा शिक्षक बनेल या उद्देशाने बांते यांनी नातेवाईकांकडून उसणवारी करून ५ लाख रूपयाची जुळवाजुळव केली. मुरलीधर कंगाले रा.उसरागोंदी यांच्या मध्यस्थीने १५ आॅक्टोबर २०११ ला ही रक्कम भालेराव यांना दिली. त्यावेळी मनोहर ठवकर, प्रसाद बांते व दोनोडे उपस्थित होते, असे टिकाराम बांते यांनी तक्र ारीत नमूद केले आहे. परंतु, फेब्रुवारी महिना लोटूनही नोकरीचे आदेश मिळाले नाही. त्यामुळे टिकाराम बांते यांनी भालेराव यांना विनंती केली. शेवटी २ मार्च २०१५ ला स्वत:च्या स्वाक्षरीचे अडीच लाख रूपयांचा धनादेश बांते यांचे नातेवाईक अरविंद हलमारे यांच्याकडे आणून दिला. यावेळी भालेराव यांच्यासोबत शाळेचा शिपाई जयदेव कांबळे सोबत होता. उर्वरीत रक्कम एक महिन्यात देण्याची कबुलीही दिली होती. लाखनी स्टेट बँकेचा अडीच लाख रूपयाचा धनादेश दिला. परंतु खात्यात पैसे नसल्यामुळे बँकेतून धनादेश परत आला. त्यानंतर पैसे मिळण्यासाठी त्यांनी भालेराव यांना मागणी केली. परंतु कारणे समोर करीत टाळाटाळ करीत आहेत. ७ जून २०१५ रोजी रविंद्र भालेराव यांच्या घरी जाऊन पैशाची मागणी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन शिवीगाळ केल्याचे बांते यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी टिकाराम बांते यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांना निवेदन दिले. परंतु, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यासंदर्भात भालेराव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. (नगर प्रतिनिधी)