शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार ठरतेय मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:27 IST

सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना करडी परिसरातील कोरडा दुष्काळ संपविण्यासाठी, जलस्त्रोतांचे बळकटीकरण व पुनर्जिवन करण्यासाठी राबविण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देकरडी परिसरात जलसंकट : सर्वांच्या पुढाकाराची गरज, वृक्ष संवर्धन व संगोपन मोलाचे

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना करडी परिसरातील कोरडा दुष्काळ संपविण्यासाठी, जलस्त्रोतांचे बळकटीकरण व पुनर्जिवन करण्यासाठी राबविण्यात आलेली आहे. सन २०१५-१६ मध्ये ४ गावात ही योजना राबविण्यात आली. पुढील वर्षात तालुक्यातील २० गावे या योजनेत समाविष्ट आहेत. पंरतु, सध्यातरी योजना शासकीय यंत्रणापुरतीच योजना मर्यादीत असून डबके ठरु पाहत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने योजना लोकाभिमुख होण्यासाठी व सर्वांना लाभ मिळण्यासाठी योजनेला लोकचळवळीचे स्वरुप येणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची आवश्यकता आहे.करडी परिसरातील दुष्काळी कोरडवाहू भागात जलयुक्त शिवार योजना मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून सुरु आहे. लोकसहभागाचा येथे नामोनिशान नाही. लोकांची उदासिनता यासाठी कारणीभूत ठरतांना दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणून परिसराला सतत दुष्काळाचे चटके बसत आहेत. मागील ४ वर्षांपासूनची नापिकी व भविष्यात होणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार ही लोकचळवळ झाल्याशिवाय गत्यंतर नाही, याची जाणीव होण्यासाठी प्रचार व प्रसाराबरोबर जाणीवजागृतीची व मानसिकता बदलविण्याची गरज आहे.वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमानाचा फटका करडी परिसरताील कृषी क्षेत्रावर अधिकच जाणवत आहे. मागील तीन वर्षापासून दुबार पेरणी शेतकºयांना करावी लागत आहे. शेकडो हेक्टर शेती वेळेवर न आलेल्या पावसामुळे पडीत राहत आहे. रोवणीपर्यंतची शेतकºयांनी केलेली मेहनत व खर्च त्यामुळे वाया जात आहे. नैराश्यातून शेतकरी आत्महत्या होत आहेत. उन्हाळ्यात भिषण पाणी टंचाईचा सामना सर्वांना करावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करता पाणी संकटावर मात करण्यासाठी वृक्ष लागवउीसाठी सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये, प्रतिष्ठीत नागरिक व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे सर्वांच्या हिताचे ठरणारे आहे.शासन अनेक वर्षांपासून जलसंधारणाचे काम करत आहे. मात्र, अद्यापही पाणीटंचाईवर मात करता आली नाही. त्यामुळेच ही जलयुक्त शिवार योजना लोकचळवळ होऊन गावागावात शासन व जनतेच्या मदतीने तसेच सामाजिक संस्थाच्या श्रमदानातून जलसंधारणाची, नदी-नाले तलाव खोलीकरणाची कामे झाली पाहिजेत. ज्या गावातील ग्रामस्थ पाणी व सिंचन प्रश्नावर एकत्र आले त्या गावांचा आज चेहरामोहरा बदलून गेला आहे. या सर्व बाबींचा आदर्श डोळ्यासमोर घेण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये विविध सामाजिक संस्था व संघटनाबरोबर लोकसहभागातून ओढे, नाले, तलाव यांचे रुंदीकरण व खोलीकरणाची कामे युध्दा पातळीवर सुरु आहेत. यामुळे भविष्यातील पाण्याचा दुष्काळ संपविण्यास मोलाची मदत होणार आहे. जलयुक्त शिवार चळवळ लोकचळवळ झाली तरच शेतकºयांच्या माथी लागलेला दुष्काळाचा कलंक पुसला जाईल. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होईल, बोरवेल्स खोदण्यात कायमची बंदी येईल व त्याचा फायदा निश्चितच शेतशिवाराला व पिकांना होईल. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नैसर्गिक तलाव, बोड्या जानेवारी महिन्यातच कोरड्या पडतात. उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट असतो. पाण्यासाठी दाहिदिशा भटकण्याची वेळ नागरिकांवर येते. पाण्याचा दुष्काळ संपविण्याची क्षमता जलयुक्त शिवार आहे. गरज आहे तिला लोकाभीमुख करण्याची. तसे झाल्यास श्रमदानातून गावे पाणीदार होतील. दुष्काळाची चिंता मिटेल. जलयुक्त शिवार लोकचळवळी बरोबर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम सर्वस्तरातून राबविल्यास पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार नाही.