शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

लघु सिंचनाला अधिकाऱ्याचा ‘खोडा’!

By admin | Updated: June 4, 2016 00:20 IST

जिल्हा परिषदेतील काही अधिकारी मंत्र्यांचे निर्देश असतानाही त्यांच्या आदेशाची अवहेलना करीत आहेत.

मंत्र्यांच्या आदेशाची अवहेलना : तलावांच्या जलस्त्रोतात होणार घटप्रशांत देसाई  भंडाराजिल्हा परिषदेतील काही अधिकारी मंत्र्यांचे निर्देश असतानाही त्यांच्या आदेशाची अवहेलना करीत आहेत. हा प्रकार जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागातून दिसून आला आहे. जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाच्या अखत्यारित १ हजार १५४ मलगुजारी तलाव आहेत. या तलवांच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी त्यांच्यावर आहे. सुमारे २५० वर्षापूर्वी निर्माण करण्यात आलेल्या या तलावांची सध्याची परिस्थिती दयनिय आहे. अनेक तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. अनेकांमध्ये माती मोठ्या प्रमाणात साचल्याने तलावांची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. यामुळे तलावांच्या जलसाठ्यात कमालिची घट निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे. मागील काही वर्षात राज्यात पाऊस अल्प प्रमाणात पडत आहे. दुसरीकडे पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने भूगर्भातील जलसाठा आटला आहे. याविपरीत भविष्यात राज्यातील नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागणार असल्याची बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजनेवर भर दिला आहे. यासोबतच जलपुनर्भरणातून पाणी संकटावर मात करता येणार असल्याने त्यावर राज्य शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. यासाठी शासनाकडून जिल्हा परिषद लघु सिंचाई विभागाला तलावांच्या कामांसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त होऊनही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामांना सुरूवात व्हायला पाहिजे होते. मात्र, येथील लघु सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांना सेवानिवृत्तीला काही महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असल्यामुळे त्यांनी निरूत्साहीपणा दाखवून लाखोंचा निधी जिल्हाधिकाऱ्यांना परत केला तर कोट्यवधी रूपयांचा निधी तिजोरीत पडलेला आहे.ही बाब ‘लोकमत’ने लावून धरली असता पावसाळ्याच्या तोंडावर काही कामे करून निधीची विल्हेवाट लावण्याचा घाट रचला होता. मात्र, ‘लोकमत’ने विषय समोर आण्यामुळे कामांच्या निविदा रद्द करण्यात आल्या. यावरून अधिकाऱ्यांनी लाखोंच्या निधीची अफरातफर केल्याचे हे सिध्द झाले.