शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

मिनी ट्रक उलटला - २४ महिला मजूर जखमी

By admin | Updated: November 25, 2014 22:49 IST

धान कापणीकरिता महिला मजुरांना घेऊन जाणारा मिनी ट्रक उलटून झालेल्या अपघातात २४ महिला जखमी झाल्या. यातील तीन महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना भंडारा येथे हलविण्यात आले आहे.

तुमसर : धान कापणीकरिता महिला मजुरांना घेऊन जाणारा मिनी ट्रक उलटून झालेल्या अपघातात २४ महिला जखमी झाल्या. यातील तीन महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना भंडारा येथे हलविण्यात आले आहे. २१ महिलांवर तुमसर उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा अपघात तुमसर-भंडारा मार्गावर खरबी शिवारात मंगळवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडला. तुमसर तालुक्यातील खापा येथून मोहाडी तालुक्यातील चिचखेडा येथे ३० महिला मिनी ट्रक क्रमांक एम.एच. ३६ एफ १२५० ने जात होत्या. तुमसर भंडारा महामार्गावरील खरबी शिवारात दुसऱ्या वाहला ओव्हरटेक करताना मिनी ट्रकच्या चालकांचे नियंत्रण सुटल्यामुळे मिनी ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. यातील २४ महिला जखमी झाल्या. या अपघातात अश्विनी झाडे (३०), सविता ठवकर (२८), शिला मोहतुरे (३५), मंगला बोंदरे (३३), जयवंता माने (३३), पार्बता ढबाले (४५), सत्यशिला माने (३८), कविता कवरे (३५), ममता डोंगरे (३०), शिला ठवकर (३८), अनिता कोडवते (४२), वनिता ठवकर (४०), निर्मला तुमसर (४०), प्रभा बोंदरे (४२), भारती काळे (४०), गिरजा ठवकर (४५), संगीता ठवकर (३५), सुलभा हलमारे (६०), सुग्रता माने (५५), शिला हलमारे (४०), शिवकांता डोंगरे (४०), रा.खापा गंभीर जखमी असून त्यांच्यावर तुमसर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गिरजा ठवकर (५५), उषा रामटेके (३०) व राधिका ठवकर (५०) या तीन महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मोहाडी तालुक्यातील चिचखेडा, पिंपळगाव, कान्हळगाव, हरदोली परिसरात धान कापणीची मजुरी जास्त देण्यात येत असल्यामुळे परिसरातील गरीब महिला जीव धोक्यात घालून अशा वाहनातून येजा करीत आहेत. परंतु क्षमतेपेक्षा अधिक लोकांना वाहून नेत असतानाही वाहतूक पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. अपघातानंतर चालक सेवक भोयर (३८) रा.खापा स्वत:च पोलिसांच्या स्वाधीन झाला. (तालुका प्रतिनिधी)