शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
4
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
5
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
6
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
7
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
8
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
9
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
10
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
11
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
12
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
13
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
14
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
15
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
16
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
17
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
18
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
19
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
20
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?

मिनी मंत्रालयातून दोघांचा विधानभवनात प्रवेश

By admin | Updated: October 20, 2014 23:07 IST

ग्रामपंचायतीला राजकारणाची प्रथम पायरी म्हणून ओळखल्या जाते तर जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालयाचा दर्जा आहे. भंडारा जिल्हा परिषदेत चरण वाघमारे आणि बाळा काशिवार हे विद्यमान सदस्य आहेत.

प्रशांत देसाई - भंडाराग्रामपंचायतीला राजकारणाची प्रथम पायरी म्हणून ओळखल्या जाते तर जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालयाचा दर्जा आहे. भंडारा जिल्हा परिषदेत चरण वाघमारे आणि बाळा काशिवार हे विद्यमान सदस्य आहेत. या दोघांनाही भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली. त्यात दोघांनीही दणदणीत विजय मिळवून मिनी मंत्रालयातून थेट विधानभवनात प्रवेश केला आहे. दोन जिल्हा परिषद सदस्यांना एकाच वेळी विधानसभेत प्रवेश मिळाल्याचे यावेळी हे राज्यातील पहिले उदाहरण ठरले आहे.भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा क्षेत्र आहेत. त्यात भंडारा, तुमसर व साकोली या क्षेत्राचा समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने तुमसर क्षेत्रातून चरण वाघमारे यांना तर साकोली क्षेत्रातून बाळा काशीवार यांच्यावर पक्षनिष्ठ कामावर विश्वास दर्शवून त्यांना उमेदवारी दिली. यात दोघांनीही पक्षश्रेष्ठीचा विश्वास सार्थ ठरवित तुमसर व साकोली या क्षेत्रातून प्रचंड मताधिक्याने प्रतिस्पर्ध्यावर मात करून विधानभवनात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजताच शिवसेनेसोबत असलेली भाजपाची युती संपुष्ठात आल्यानंतर भाजपकडून योग्य उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. त्यापूर्वी कोण उमेदवार वरचढ ठरेल, याचे सर्व्हेक्षणही केले. यात तुमसर क्षेत्रात चरण वाघमारे तर साकोली क्षेत्रात राजेश काशीवार यांचे कार्य पक्षश्रेष्ठीच्या लक्षात आले. याशिवाय एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपसाठी केलेली पक्षबांधणी, रात्रंदिवस केलेला प्रचार पक्षश्रेष्ठीच्या लक्षात आला. त्यानंतर भाजपने या दोघांना उमेदवारी दिली.तुमसरचे नवनिर्वाचित आमदार चरण वाघमारे हे मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव जिल्हा परिषद क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करतात तर साकोलीचे नवनिर्वाचित आमदार राजेश काशीवार हे साकोली तालुक्यातील एकोडी जिल्हा परिषद क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करतात.या दोन्ही उमेदवारांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या कार्याने प्रभावित होऊन पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखविल्याने या क्षेत्रात असलेल्या कार्यकर्त्यांच्या व मतदारांच्या भरवशावर त्यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतली. दिवसागणीक निवडणुकीचे वातावरण तापू लागले होते. बुधवारला मतदान झाले. रविवारला निकाल लागला. यात दोघांनीही पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविला. दोघांनीही आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मताधिक्याने विजय मिळविला. सामाजिक व राजकीय क्षेत्रात काशीवार व वाघमारे यांचे योगदान महत्वपूर्ण असल्यामुळे मोठ्या फरकाने त्यांना विजय नोंदविता आला. दोघेही जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य असून पहिल्यांदाच लढविलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होऊन दोघांनाही विधानभवनात पोहचता आले. भंडारा जिल्ह्यात यापूर्वी नाना पटोले, सेवक वाघाये, नाना पंचबुद्धे यांचा जिल्हा परिषद ते विधानभवन असा प्रवास आहे. मात्र एकाचवेळी दोन विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आमदार होण्याचा यावेळी हा राज्यातील पहिलाच प्रसंग असावा. जिल्हा परिषदेत क्षेत्राच्या विकासासाठी झटणारे सदस्य म्हणून या दोघांचीही ओळख आहे. त्यांच्या विजयाने तुमसर व साकोली विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना त्याच क्षेत्रात विकासाचा झंझावात येण्याची अपेक्षा आहे. भंडाऱ्याचे नवनिर्वाचित आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांनीही अनपेक्षीत यश मिळवून सुखद धक्का दिला.