शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

धूळ प्रदुषण लपविण्यासाठी शहरातील रस्त्यांवर ओतले करोडो लिटर पाणी

By युवराज गोमास | Updated: November 20, 2023 14:23 IST

जिल्हा प्रशासनाचे लक्तरे वेशीवर : नागरिकांत असंतोष

भंडारा : 'शासन आपल्या दारी' उपक्रमांतर्गत शहरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री दाखल होणार असल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट होते. दिवाळीपूर्वी नागरिकांनी आपआपल्या घर व परिसराची स्वच्छता केली असताना प्रशासनाने दिवाळीनंतर शहरातील रस्त्यांची, नाले, गटारांची व रस्त्यांच्या कडांची स्वच्छता केली. दुर्गंधीयुक्त घनकचरा तातडीने उचलून विल्हेवाट लावली.

शहरात सातत्याने धूळ प्रदुषण असतांना प्रशासन कमालीचे दुर्लक्ष करून होते. शहरात अनेक वर्षांपासून नागरिकांना दुषीत पाणी प्यावे लागत आहे. शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. परंतु, राज्यकर्ते शहरात येण्यापूर्वीच सकाळीच अनेक टँकरच्या माध्यमातून करोडो लिटर पाणी रस्त्यांवर ओतून आपले पाप लपविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केल्याचा संतोष नागरिकांत व्यक्त होत आहे.

भंडारा शहरात गत दोन वर्षांपासून प्रचंड धूळ पदुषण आहे. रोज स्वच्छता न केल्यास घरात धुळीचा थर साचतो. स्वच्छ कपडे घालून बाहेर पडताच कपडे मळतात. पांढरे कपडे लाल झालेले दिसून येताच. शहरात धुळ पदुषणाचा स्तर सातत्याने वाढता आहे. परंतु, नगर पालिका प्रशासन व जिल्हा पदुषण नियंत्रण विभाग याकडे डोळेझाक करून आहे.

हिरवेगार व स्वच्छ सुंदर शहराचे स्वप्न भंगलेभंडारा शहरात धूळ प्रदुषणामुळे श्वसन व डोळ्यांचे आजार वाढीस लागले आहे. अनेकांचा दमा विकाराने ग्रासले आहे. हिरवेगार शहराचे स्वप्न धुळीस मिळाल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. अरूंद रस्त्यांवर अतिक्रमणे वाढली असून वाहतुकीची कोंडी नेहमीची बाब झाली आहे. फुटपाथ व्यावसायिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.

अंतर्गत रस्त्यांचे बेहालशहरात पावसाळ्यापर्यंत गटार लाइन टाकण्यासाठी अंतर्गत सर्व पक्के सिमेंट रोड व डांबरीकरण रस्ते खोदण्यात आले. पाईप लाइन टाकल्यानंतर केवळ मातीने बुजविण्याचे आले. त्यामुळे संपूर्ण पावसाळा नागरिकांना चिखलातून काढावा लागला. अद्यापही अनेक रस्ते मजबूत करण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरात धुळीचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे.

शहरात स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी वर्षभरापासून मिळत नाही. अनेकांच्या नळाला दूषीत पाणी पुरवठा होत आहे. वर्षभर स्वच्छतेचा अभाव असतो. रस्त्यांची दूरवस्था आहे. प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागतो आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने केवळ एक दिवसासाठी करोडे लिटर पाणी रस्त्यांवर ओतणे चुकीचे व दुर्भाग्यपूर्ण आहे.- भगीरथ धोटे, नागरिक, भंडारा.

हा जिल्हा प्रशासनाचा दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. शहरात रोड-रस्त्यांचे बेहाल आहे. दुषीत पाणी पुरवठा होत आहे. गटार लाइनचे काम अद्यापही अपूर्ण आहेत. शहरात धुळीचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. परंतु, यावर उपाययोजना होत नाही.- गोपाल सेलोकर, नागरिक, भंडारा.

टॅग्स :Waterपाणी