शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यापेक्षाही दूध झाले स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:02 IST

कर्जाच्या खाईत खितपत पडलेल्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर दुष्काळाचे भीषण संकट आहे.

ठळक मुद्देदुधाला १९ रूपये दर : शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती असंतोष

राहुल भुतांगे ।आॅनलाईन लोकमततुमसर : कर्जाच्या खाईत खितपत पडलेल्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर दुष्काळाचे भीषण संकट आहे. अशातच शासनाने दुधाचे दर ६ रूपयाने कमी करून पाण्यापेक्षाही दुध स्वस्त करून शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ दाखविल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे.एकीकडे शासन गोरक्षणावर भरमसाठ पैसा खर्च करीत आहे तर दुसरीकडे चाऱ्यांच्या किंमती भयावह वाढविल्या आहेत. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकºयांना शेती परवडण्यासारखी राहिलेली नाही. आधीच धानाला कमी भाव आहे. त्यातही यावर्षी दुष्काळामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असताना शासनाने दुधाचे दर २५ रूपयांवरून १९ रूपये करून ६ रूपयांनी घटविले आहे. बाजारात मिनरल वॉटर २० रूपयाला मिळते. ईथे शासनाने पाण्यापेक्षाही दुधाचे दर कमी करून टाकल्याने शेतकºयांच्या कष्टाची थट्टा सुरू आहे. परिणामी शेतकऱ्यांत असंतोष धुमसत आहे. दुधाला योग्य दर मिळवून द्यावा, अशी अपेक्षा गोपालक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.केंद्र व राज्य शासन हे उद्योगपतीचे असून शेतकरी विरोधी आहे. दुधाला योग्य दर मिळवून देण्यासाठी व दुध संकलनाकरिता शासकीय व्यवस्था करण्याकरिता काँग्रेसतर्फे आंदोलन उभारण्यात येणार आहे.- प्रमोद तितिरमारे, शेतकरी तथा प्रदेश सचिव काँग्रेस कमिटी.