शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

भंडारा उपविभागात पूरनियंत्रणासाठी सूक्ष्म नियाेजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 05:00 IST

भंडारा तालुक्यात ३८ गावे वैनगंगा नदीच्या तीरावर आहे. त्यापैकी २९ गावे वैनगंगा, पाच गावे सुर नदी आणि चार गावे कन्हान नदीच्या तीरावर आहेत. त्यापैकी २७ गावांना पुराचा दरवर्षी फटका बसताे. पवनी तालुक्यात वैनगंगा नदी तीरावर ३३ गावे असून, या ३३ही गावांना दरवर्षी पुराचा सामना करावा लागताे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात या दाेन तालुक्यांमध्ये हाहाकार उडाला हाेता. अनेक गावांचा संपर्क तुटला हाेता. प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले हाेते.

ठळक मुद्दे७१ गावे नदी तीरावर : उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली गावांची पाहणी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगेच्या महापुराचा सर्वाधिक फटका भंडारा आणि पवनी या दाेन तालुक्यांना बसताे. गतवर्षी या दाेन तालुक्यांत भीषण परिस्थिती निर्माण झाली हाेती. ही परिस्थिती टाळण्यासाठी भंडारा उपविभागातील नदी तीरावर ७१ गावे असून, त्यापैकी ६० गावांना दरवर्षी पुराचा फटका बसताे. या गावांचे सूक्ष्म नियाेजन करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी रवींद्र राठाेड यांनी संभाव्य पूरबाधित गावांना भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली आहे. भंडारा उपविभागात भंडारा आणि पवनी तालुक्यांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यात ३८ गावे वैनगंगा नदीच्या तीरावर आहे. त्यापैकी २९ गावे वैनगंगा, पाच गावे सुर नदी आणि चार गावे कन्हान नदीच्या तीरावर आहेत. त्यापैकी २७ गावांना पुराचा दरवर्षी फटका बसताे. पवनी तालुक्यात वैनगंगा नदी तीरावर ३३ गावे असून, या ३३ही गावांना दरवर्षी पुराचा सामना करावा लागताे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात या दाेन तालुक्यांमध्ये हाहाकार उडाला हाेता. अनेक गावांचा संपर्क तुटला हाेता. प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले हाेते. यावर्षी पुन्हा हीच परिस्थिती उद्भवू नये, यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात आपत्ती व्यवस्थापन विभागाने सूक्ष्म नियाेजन केले आहे. प्रत्येक उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना भेटी देण्याचे निर्देश दिले हाेते.भंडाराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठाेड आणि तहसीलदार अक्षय पाेयाम यांनी भंडारा तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. त्यात पिंडकेपार, काेरंभी, सालेबर्डी, खैरीपा, कारधा, सालेबर्डी सारसाळ, खापा, आझीमाबाद, करचखेडा, खमारी या गावांचा समावेश आहे. गावातील सरपंच, पाेलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. नदीला पूर आल्यास काय करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामसेवकांनी गावकऱ्यांच्या संपर्कात राहून माहिती प्रशासनाला देण्याचे निर्देश दिले.

या गावांचा तुटताे पुरामुळे संपर्क- वैनगंगा आणि इतर नद्यांना येणाऱ्या पुरामुळे जिल्ह्यातील १८ गावांचा संपर्क तुटताे. त्यात भंडारा तालुक्यातील अर्जुनी काेरंभी, पिंडकेपार, सुरेवाडा, पवनी तालुक्यातील सावरगाव, पवना खुर्द या गावांचा समावेश आहे. यासाेबतच भंडारा तालुक्यातील गणेशपूर ते काेरंभी रस्ता, भिलेवाडा ते सुरेवाडा, सिंधी काॅलनी ते मेंढा रिंगराेड, कारधा बायपास हे मार्ग बंद हाेतात, तर पवनी तालुक्यातील नेरला ते सावरगाव, पहेला ते आंभाेरा, पवनी ते जुनाेना, मांगली ते वलनी आणि पवनी ते धानाेरी या गावांचा समावेश आहे. या गावांवर महसूल विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पूरबाधित गावांत समन्वय समिती स्थापन करण्यात आली. नागरिकांना संभाव्य धाेका वाटत असेल आणि सूचना मिळाल्यावर त्यांनी तात्पुरत्या निवाऱ्यांचा आश्रय घ्यावा. पूरपरिस्थितीच्या काळात प्रशासनाला सहकार्य करावे. अनेकदा घरातील महिला आणि लहान मुलांना सुरक्षितस्थळी पाठविले जाते. परंतु, पुरुष घरातच थांबताे. पूरपरिस्थितीत जीव वाचविणे महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकाेरपणे पालन करावे.- रवींद्र राठाेड,  उपविभागीय अधिकारी भंडारा

 

टॅग्स :floodपूर