शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

‘मेस्टा’ने दिला शाळा बंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:12 IST

महाराष्ट्र इंग्लीश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन भंडारा ‘मेस्टा’ च्या बैठकीत प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी १५ डिसेंबरला शाळा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देमोर्चाही काढणार : कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला निर्णय

आॅनलाईन लोकमतभंडारा : महाराष्ट्र इंग्लीश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन भंडारा ‘मेस्टा’ च्या बैठकीत प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी १५ डिसेंबरला शाळा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर महामोर्च्याच्या आयोजनासंबंधी चर्चा झाली.सदर बैठक मेस्टाचे संस्थापक अध्यक्षतेखाली येथील जेसीस कॉन्व्हेंटमध्ये पार पडली. यावेळी मेस्टाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र वैद्य, शत्रुध्न भांडारकर, राकेश गजभिये, तथागत मेश्राम, तरोणे, कावळे, लोखंडे आदी उपस्थित होते. बैठकित अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने १५ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर महामोर्च्याच्या आयोजनासंबंधी चर्चा करण्यात आली.या महामोर्च्यात जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या संस्था चालकांनी व मुख्याध्यापक शिक्षकांनी शाळा बंद ठेऊन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.प्रलंबित असलेल्या मागण्यांवर चर्चा करण्यात आलेल्या विषयांमध्ये शाळेसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा लागू करण्यात यावा, आर.टी.ई. (राईट टू एज्यूकेशन) कायद्याप्रमाणे मोफत प्रवेशाचा रखडलेला निधी तात्काळ वाटप करण्यात यावा, स्कूल बसला कोणताही अतिरिक्त कर आकारण्यात येऊ नये, इंग्रजी शाळांच्या शिक्षकांना किमान योजना सुरू करण्यात यावी, इंग्रजी शाळेच्या शिक्षकांचा १० लाखांचा विमा सरकारतर्फे उतरण्यात यावा, इंग्रजी शाळांना लोकप्रतिनिधींचा निधी वापरण्याची परवानगी देण्यात यावी, इंग्रजी शाळांना फी रेग्युलेशन कायदा लागू करू नये, विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य करण्यात यावा, इंग्रजी शाळांना स्थलांतरणाची परवानगी देण्यात यावी, नैसर्गीक वाढ व दर्जा वाढ त्वरित देण्यात याव्यात, इंग्रजी शाळांच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार सुरू करण्यात यावा, आदी मागण्यांचा समावेश आहे. विद्यार्थी शिक्षक व संस्था चालक यांच्या रास्त मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.