लाखनी : तालुक्यातील पालांदूर (चौ.) येथील गोविंद मागासवर्गीय वसतीगृहाच्या महिलास्वयंपाकिनचा संस्था अध्यक्षांनी विनयभंग करून शिवीगाळ केल्याचा गुन्हा पालांदूर पोलीस स्टेशन येथे दाखल केला आहे.स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद दिगांबर भांडारकर (३५) व त्यांचे सहकारी अजिंक्य मोहन भांडारकर (२५) हे ३ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता काशिनाथ निखाडे यांच्या घरी असलेल्या मागासवर्गीय वसतीगृहात प्रवेश केला. आरोपींनी स्वयंपाक मदतनिस महिलेस शिवीगाळ केली आरोपींनी महिलेचा हात ओढून विनयभंग केला. शिवीगाळ करून ढकलून दिले व जीवे मारण्याची धमकी दिली.गोविंद मागासवर्गीय वसतीगृह हे राष्ट्रीय शिक्षण संस्थेद्वारे संचालित केल्या जाते. आरोपीविरूद्ध पालांदूर पोलीस स्टेशन येथे भादंवि ३४५, ३४ (२), ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वसतीगृहात संस्था सदस्यांचा मुलगा अधिक्षक आहे. (तालुका प्रतिनिधी)
संस्था अध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा
By admin | Updated: February 4, 2015 23:10 IST