शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

विजयी प्रमाणपत्र गळ्यात घालून सदस्य पोहोचले तहसीलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 05:00 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक दोन टप्प्यात झाली. १९ जानेवारी रोजी निकाल घोषित झाला. जिल्हा परिषदेचे ५२ व पंचायत समितीच्या १०४ सदस्यांना विजयी प्रमाणपत्र देण्यात आले. लवकरच सत्ता स्थापन होईल अशी अपेक्षा होती. मात्र सत्ता स्थापनेच्या ना जिल्हा परिषदेत हालचाली दिसत ना पंचायत समितीत. नवनिर्वाचित सदस्यांची लोकशाहीत थट्टा केली जात असल्याचा आरोप नवनिर्वाचित सदस्य करीत आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जिल्हा परिषदपंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागून तब्बल दोन महिने झाले. सत्ता स्थापनेचा तिढा मात्र अद्यापही कायम आहे. निवडून आलेल्या सदस्यांमध्ये असंतोष खदखदत असून याचाच प्रत्यय मंगळवारी तुमसरमध्ये आला. विजयी प्रमाणपत्र चक्क गळ्यात घालून काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचे नवनिर्वाचित सदस्य तहसीलमध्ये पोहोचले. प्रशासनाचे लक्ष वेधत शासनाला निवेदन पाठविले. जिल्हा परिषदपंचायत समितीची निवडणूक दोन टप्प्यात झाली. १९ जानेवारी रोजी निकाल घोषित झाला. जिल्हा परिषदेचे ५२ व पंचायत समितीच्या १०४ सदस्यांना विजयी प्रमाणपत्र देण्यात आले. लवकरच सत्ता स्थापन होईल अशी अपेक्षा होती. मात्र सत्ता स्थापनेच्या ना जिल्हा परिषदेत हालचाली दिसत ना पंचायत समितीत. नवनिर्वाचित सदस्यांची लोकशाहीत थट्टा केली जात असल्याचा आरोप नवनिर्वाचित सदस्य करीत आहेत. प्रशासकांच्या हाती सत्ता असल्याने सदस्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. यामुळे संतप्त झालेले काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य रमेश पारधी, पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे, कंचनलाल कटरे, नरेंद्र गेडाम, राष्ट्रवादीचे हिराचंद पुरामकर व भाजपच्या पंचायत समिती सदस्य सुशीला पटले यांनी थेट तहसील कार्यालय गाठले. गळ्यात विजय प्रमाणपत्र घालून अभिनव निषेध  नायब तहसीलदार पेंदाम यांना निवेदन सदर करण्यात आले.

...तर सदस्यत्वाचे राजीनामे देऊ- राज्य शासनाकडून सत्तास्थापनेसंबंधी अधिसूचना जाहीर झाली नाही. जनतेने निवडून दिल्यानंतर त्यांची कामे करता येत नसली तर विजयी प्रमाणपत्राचे करायचे काय, असा प्रश्न सदस्यांना पडला आहे. केवळ प्रमाणपत्र घेऊन करायचे काय, असा सवाल सदस्य विचारत आहेत. सत्ता स्थापनेची अधिसूचना निघाली नाही तर आपले राजीनामे जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा इशारा या सदस्यांनी दिला. एवढेच नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालयावर नवनियुक्त सदस्यांसह नागरिकांचा मोर्चा काढण्यात  येईल, असेही या निवेदनात म्हटले आहे.

विकासकामांना खीळ- निवडणूक होऊनही जिल्हा परिषद व पंचायत समितीत प्रशासक राज सुरू आहे. अधिकारी आपल्या मर्जीने काम करीत आहेत. नागरिक निवडून आलेल्या सदस्यांकडे तक्रारी, कामे घेऊन येत आहेत. मात्र नागरिकांचे काम वेळेवर होत नाही. शासनाच्या विकासकामांना व विविध योजनांना खीळ बसत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कुणाचाच वचक नाही. नवनियुक्त सदस्यांना कार्यालयात मनस्ताप सहन करावा लागतो. आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेऊन प्रशासक राज संपुष्टात आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समिती