शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औषधीयुक्त ‘जांभुळ’ झाड होतेय दुर्मिळ

By admin | Updated: June 17, 2016 00:42 IST

बहुऔषधी गुणयुक्त १०० वर्षांपेक्षा अधिक काळ जगणारा आणि इतरांनाही शतावरी करण्यात उपयुक्त ‘जांभुळ वृक्ष’ अलिकडे दुर्मिळ होत आहे.

आयुर्वेदात वृक्षाला मोठे महत्त्व : १०० वर्षांपेक्षा अधिक जगणारे झाडलाखांदूर : बहुऔषधी गुणयुक्त १०० वर्षांपेक्षा अधिक काळ जगणारा आणि इतरांनाही शतावरी करण्यात उपयुक्त ‘जांभुळ वृक्ष’ अलिकडे दुर्मिळ होत आहे. वाढती वृक्षतोड याचे प्रमुख कारण आहे. परिणामी, जांभुळ फळाचे दर्शनही दुर्मिळ होत आहे. जून महिना लागताच १०० रूपये किलो प्रमाणे ही फळे खरेदी करावी लागतात. जांभळाची फळे नव्हे तर पाने, फुले, साल, खोड आणि बियांचाही औषधी म्हणून उपयोग होतो. आयुर्वेदात या वृक्षाला मोठे महत्त्व आहे.मे व जून महिन्याच्या कालावधीत ‘डोंगराची काळी मैना’ म्हणून जांभुळाचे आगमन होते. जांभळात लोहाचे प्रमाण अधिक असते. मधुमेहाच्या आजारात हे फळ महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याने त्या रूग्णांसाठी ही फळे वरदानच ठरली आहेत. मधुमेहासोबतच रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग, अस्थमा या आजारांतही जांभळाचे सेवन उपयुक्त ठरते. दररोज ४ ते ५ जांभळाचे सेवन केल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे शक्य होते. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासह हिरड्यांचे आरोग्य उत्तम राखण्यात जांभळे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. जांभळाची महती औषधी गुणधर्मावरच थांबत नाही तर जांभूळ हे उत्तम सौंदर्यप्रसाधक म्हणूनही काम करते. या फळापासून वाईन, व्हीनेगर, जेली, शरबत आदी तयार करण्यास अलिकडे सुरूवात झाली आहे. यातून नवीन उद्योगाची उभारणी होऊ लागली आहे. अशा उद्योगांकडून थेट जांभुळ खरेदी होत असल्याने त्याचा परिणाम खुल्या बाजारपेठेवर होऊ लागला आहे. यामुळे पूर्वी दिसणारी जांभळं आता बाजारात ठरावीक ठिकाणी दिसतात. या वृक्षाचे लाकूड टिकाऊ व पाणीरोधक असल्याने ते किमान १०० वर्षे टिकते. आता इमारती सिमेंटच्या असल्या तरी पूर्वी जांभुळ वृक्षाच्या राहत होत्या. बहुऔषधी, बहुपयोगी गुणधर्म जांभूळ झाडांसाठी अलिकडे कर्दनकाळ ठरला आहे. मानवाने निसर्गाकडून काही घेण्याच्या मोबदल्यात वृक्ष लागवड केली नाही. यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. (तालुका प्रतिनिधी)औषधी गुणधर्मच ठरला कर्दनकाळजांभूळ या वृक्षाचा औषधी व बहुपयोगी गुणधर्मच त्या वृक्षासाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे दिसते. लाकूड व औषधासाठी वृक्षांची कटाई होते. पण जांभूळ वृक्षांची लागवड होताना दिसत नाही. यामुळे ग्रामीण भागातूनही हे वृक्ष दिसेनासे होत असल्याचेच चित्र पाहावयास मिळत आहे.