पतीस अटकपूर्व जामीन मंजूर : आठ जणांविरुध्द गुन्हा दाखलजवाहरनगर : आयुध निर्माणी स्थित एका कर्मचाऱ्याने पत्नीला हुंड्यासाठी त्रास दिल्याने पत्नीच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिासंनी सासरकडील आठ जणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने अटकपूर्व जामीन मिळविला आहे. यात आयुध निर्माणी येथे कार्यरत असलेले कर्मचारी पंकज सुरेश शेंडे (२८) जवाहरनगर टाईप वन १६-१ यांचा लग्न नागपूर येथील मोरेश्वर उरकुडे यांच्या मुलीशी जुळले. दोन्हीकडील मंडळीनी नातेवाईकांच्या लग्नपत्रिका पोहोचते केले. लग्नाच्या १५ दिवसापूर्वी पंकज शेंडे, वडील सुरेश शेंडे (६०), आई कुंदा शेंडे (५७) ही मंडळी मुलीच्या घरी गेले. दरम्यान मुलाने व मुलांच्या वडीलाने आमच्या घरी चोरी झाली आहे. लग्नासाठी सहा लक्ष रूपये देण्याची मागणी स्वातीचे वडील मोरेश्वर उरकुडे यांच्याकडे केली. पैसे न दिल्यास लग्न होणार नाही, असेही सुचविले मुलीच्या आई-वडीलांनी पंकज शेंडे यांच्या हाती ५ लक्ष ५०० रूपये दिले. नियोजित तारखेस लग्न झाले. तीन दिवसानंतर स्वातीला सासरच्या मंडळीकडून त्रास देणे सुरु झाले. यात फ्रिज, वाशींग मशीन कार ही वस्तु तुझ्या वडीलांनी का दिला नाही असे बोलायचे. ५० हजार रुपये माहेरुन घेऊन ये नाहीतर त्रास सहन करण्याची क्षमता ठेव असे ठणकावीत होते, असे स्वातीने बयाण्यात नमुद केले. लग्नाच्या २०-२५ दिवसानंतर स्वाती शेंडे परिक्षेचा पेपर देण्यासाठी काकासोबत नागपूरला आई-वडीलांच्या घरी निघुन गेले. दरम्यान नाभीक समाज महामंडळाद्वारे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. शेवटी मुलीनेच म्हणजे स्वाती पंकज शेंडे हिने नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन जवाहरनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. १५ जून रोजी जवाहरनगर येथे पती, सासरा सासु पंकजचा मोठा भाऊ, मध्यस्थी यांच्या विरुध्द ४९८ (अ) ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)
हुंड्यासाठी विवाहितेचा सासरकडून छळ
By admin | Updated: July 2, 2016 00:31 IST