शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

धान घोटाळ्यात कारवाईची दिरंगाई भोवली; जिल्हा पणन अधिकारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 16:04 IST

२८ कोटींच्या आर्थिक नुकसानीचा ठपका

भंडारा : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत झालेल्या धान घोटाळ्यात संबंधित संस्थांवर वेळेत कारवाई करण्यात दिरंगाई करणे जिल्हा पणन अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले. राज्य सहकारी पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी त्यांना तत्काळ निलंबित केले आहे. आठ संस्थांनी धान खरेदी करताना केलेल्या अनियमिततेमुळे पणन महासंघाला २८ कोटी ३९ लाख ३१ हजार ३६५ रुपयांचा फटका बसल्याचे दिसून येत आहे.

भंडारा जिल्ह्यात आधारभूत किंमत योजनेंतर्गत संस्थांच्या माध्यमातून धान खरेदी करण्यात येते. मात्र धान खरेदी करताना अनियमितता केल्याचे पुढे आले. याबाबत ‘लोकमत’ने वृत्तही प्रसिद्ध केले होते. मात्र या संस्थांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण रमेश पाटील यांनी केल्याचे आता निदर्शनास येत आहे. या संस्थांनी धान खरेदी केल्यानंतर तो प्रत्यक्ष भरडाईसाठी देताना घट आल्याचे दिसून आले. याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या अहवालावरून जिल्हा पणन अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला. त्यात सर्व प्रकरणात त्यांनी दुर्लक्षपणा, बेजबाबदारपणा केला असून, कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याचे म्हटले आहे. त्यावरून त्यांना व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग यांनी निलंबित केले.

या आहेत आठ धान खरेदी संस्था

धान खरेदीत गैरप्रकार करणाऱ्या संस्थांमध्ये पवनी येथील आधार बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, तुमसर तालुक्यातील बपेरा येथील अन्नपूर्णा सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, भंडारा येथील संकल्प सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, तुमसर तालुक्यातील आंबागड, नाकाडोंगरी आणि वाहनी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा समावेश आहे. धान खरेदी करताना झालेल्या अनियमिततेमुळे पणन महासंघाला मोठा फटका बसला.

लोकमतने केला सातत्याने पाठपुरावा

  • अवघ्या सहा तासात सहा लाख क्विंटल धान खरेदी करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. लोकमतने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेत चौकशी समिती नेमण्यात आली. त्या अहवालावरून आता कारवाई सुरू आहे. 
  • नाकाडोंगरी आणि आंबागड येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षांसह संचालक आणि ग्रेडरवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळा प्रकरणात आतापर्यंत तीन संस्थांवलर कारवाई झाली असून पाच संस्था निशान्यावर असून त्यांच्यावरही लवकरच गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
टॅग्स :agricultureशेतीbhandara-acभंडारा