शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

बाजारपेठ पडली ओस

By admin | Updated: November 15, 2016 00:24 IST

देशाच्या चलनातून नोटा बंद केल्याने नागरिकांना मोठा आर्थिक प्रश्न भेडसावत आहे.

नोटा बंदचा फटका : बँकासह एटीएमही बंदभंडारा : देशाच्या चलनातून नोटा बंद केल्याने नागरिकांना मोठा आर्थिक प्रश्न भेडसावत आहे. आज गुरुनानक जयंती असल्याने बँक बंद होत्या. त्यामुळे बँक व एटीएममधूनही पैसे उपलब्ध झाले नसल्याने नागरिकांची परिस्थिती कोंडीत सापडल्यागत झाली. बँक बंद असल्याने याचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून आला. भंडारा शहरातील बाजारपेठेत सोमवारला शुकशुकाट दिसून आला. दिवाळीनंतरही बाजारपेठेत खरेदीदारांची रेलचेल होती. मात्र चलनी नोटा बंद झाल्याने याचा विपरित परिणाम बाजारपेठेवर दिसू लागला आहे. सोमवारला बँक बंद असल्यामुळे सदर प्रतिनिधीने शहरातील बाजारपेठेत फेरफटका मारला असता शुकशुकाट दिसून आला. लाखो रूपयांची उलाढाल होणाऱ्या बाजारपेठेतील ‘गल्ला’ अर्ध्यापेक्षाही कमीवर आला होता.८ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रूपयांची नोट बंद करण्याची घोषणा केली. त्यामुळे नागरिकांकडे पैसा असूनही त्याचा वापर बंद झाला. पैशाचा विनियोग करता यावा, यासाठी शासनाने मुदत दिली आहे. चलनी नोटा बंद केल्याने नागरिकांना २००० रूपयांची व १०० रूपयांचा नोटा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र या नोटांचा तुटवडा भरून निघालेला नाही. बँकामध्ये पैशांची अदलाबदल करून मिळत असले तरी हक्काच्या पैशाचा वापर करण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने शनिवार व रविवारला सुटीच्या दिवशी बँकीग व्यवहार सुरू ठेवले होते. परंतु पाहिजे त्या प्रमाणात पैसे उपलब्ध न झाल्यामुळे नागरिकांची ओरड सुरुच आहे. (शहर प्रतिनिधी)पैशासाठी नागरिकांची वणवणबँक व एटीएम केंद्रातून मोजकी रक्कम मिळत असल्याने नागरिक हतबल झाले आहे. सोमवारला बँका बंद असल्याने आर्थिक व्यवहार कोलमडला. काही एटीएम केंद्रातून पैसे मिळत असल्याची माहिती होताच अनेकांनी केंद्र गाठले. मात्र तिथे पोहचेपर्यंत तेथील रक्कम संपल्यामुळे अनेकांना निराश होऊन परतावे लागले. स्टेट बँकेच्या मिस्कीनटँक शाखेतील एटीएममधून पैसा मिळत असल्याने नागरिकांची रांग लागली होती.आर्थिक अर्धांगवायुचा झटकासोमवार आठवड्याचा पहिला दिवस असला तरी गुरुनानक जयंतीमुळे बँका बंद होत्या. अगोदरच पैशाची चणचण असताना बँक व एटीएम बंद असल्यामुळे नागरिकांना जणू ‘आर्थिक अर्धांगवायू’ चा झटका बसल्याची परिस्थिती उद्भवली. आज बँका बंद असल्या तरी अनेकांना याची कल्पना नसल्याने त्यांनी सकाळीच बँक गाठली. कित्येकजण लवकर नंबर लागावा या हेतूने रांगेत उभेही झाले. बँकेचा वेळ निघून गेल्यावरही बँक सुरु न झाल्यामुळे आज बँक बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांना आल्यापावली परतावे लागले.