शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

बाजार समितीत मजुरांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:01 IST

महिला मजुरांकडून वजनमाप करणारे वाहने रोखून धरण्यात आले. काही काळ व्यवहार बंद करण्यात आला. त्यावेळी बाजार समितीचे सचिव व सहसचिव व संचालक सेलोकर यांनी वजन काट्याकडे धाव घेत सदर मजुरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त महिला मजूर व मापारी हे काहिही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.

ठळक मुद्देतुमसर येथे महिला मजूर आक्रमक : काम द्या, नाहीतर खरेदी - विक्री बंद करा

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर कृषी बाजार समीतीत सोशल डिस्टन्सिंग ठेवून शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू करण्यात आला. परंतू बाजार समितीच्या मार्केट यार्डात शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या शेतमालाच्या लिलावावरुन शेतकरी, हमाल, मापारी, अडते, व्यापारी यांच्यात सामाजिक अंतर ठेवण्यात आले नाही. त्यामुळे चक्क बाजार समितीच्या यार्डात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.देशासह राज्यात कोवीड १९-कोरोना व्हायरस विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला असून, काही जीवनावश्यक वस्तूबरोबर कृषीविषयक उद्योगधंद्यांना लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात सुट देण्यात आली. त्याच धर्तीवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केड यार्डावर शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीस आणता यावा व त्यांना लॉकडाऊनच्या काळात उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक व्यवहार करण्यासंबधी राज्यातील शेतकºयांना शेतमाल खरेदी विक्रीची मुभा देण्यात आली. त्यामुळे येथील बाजार समीती प्रशासनाच्या वतीने काही नियम अटी घालून शेतकºयांनी विक्रीस आणलेल्या मालाची थेट बाजार समीतीच्या धर्मकाट्यावर वजन करून माल खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू करण्यात आला. परंतू २० एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास जेव्हा बाजार समितीत शेतकºयांच्या शेतमालाचा वजनमाप धर्मकाट्यावर करायला सुरुवात करण्यात आली. तेव्हा येथील संतप्त महिला व पुरुष मापारी, मजुरांनी चक्क काही काळ बाजार समितीच्या वजन काट्याजवळ आपला ठिय्या मांडला. जो पर्यंत बाजार समितीत आमच्या हाताला काम मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शेतकºयांच्या शेतमालाचा वजनमाप धर्मकाट्यावर करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत ठिय्या मांडला.दरम्यान महिला मजुरांकडून वजनमाप करणारे वाहने रोखून धरण्यात आले. काही काळ व्यवहार बंद करण्यात आला. त्यावेळी बाजार समितीचे सचिव व सहसचिव व संचालक सेलोकर यांनी वजन काट्याकडे धाव घेत सदर मजुरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त महिला मजूर व मापारी हे काहिही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.ज्या प्रमाणे बाजार समीतीच्या खुल्या मार्केट यार्डात सामाजिक अंतर राखून शेतकऱ्याच्या शेतमालाचा, खरेदी विक्रीचा व्यवहार केला जात होता. मालाचा वजनमाप हात काट्याने करून, येथील व्यापारी, अडते, मापारी, महिला पुरूष हमालांच्या हाताला काम मिळत होता. परंतु आजघडीला सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत बाजार समितीने शेतकºयांचा शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवहार करतांना गर्दी टाळण्यासाठी शेतमालाचा वजनमाप हा धर्मकाट्यावर करण्याचा निर्णय घेतला. त्यात व्यापारी, अडते, शेतकरी, यांचा व्यवहार सुरू झाला. परंतु येथील हातावर पोट भरणाऱ्या, हमाल, मापारी, मजूरवर्ग शेतकºयांनी विक्रीस आणलेल्या मालाची व्यापारी यांच्या बारदाण्यात भराई करणे, मालाचा हात काट्याने वजनमाप करणे, साफ सफाई करणे असा त्यांच्या हाताला काम मिळत असतो. त्या मोबदल्यात त्यांना शेतकºयांकडून व संबधित व्यापाºयाकडून प्रत्येकी पोत्यामागे मजुरी म्हणून आर्थिक मोबदला दिला जात असतो. परंतु सोमवारी बाजार समिती मधील धर्मकाट्यावरील वजनमापाचा व्यवहार सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत करण्याचा खरा प्रयत्न केला असला तरी, सोमवारी येथील शेकडो महिला-पुरुष, मजूर आपल्या नियमित मजुरीपासून वंचित राहिल्याने ते संतप्त झाले. त्यामुळे त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवीत काही काळ बाजार समितीच्या धर्मकाट्यावर आपला ठिय्या मांडून गर्दी जमवीत वाहनावरून मालाचा धर्मकाट्यावर केला जाणारा वजनमाप रोखून धरले. दरम्यान बाजार समिती प्रशासनाच्या वतीने वेळीच पोलिसांना बोलावून गर्दी बाजूला करण्यात आल्यानंतर वातावरण निवळले.हमाल मजुरीपासून वंचितबाजार समितीच्या मार्केड यार्डात नियमित काम करणाºया हमाल व मापारी यांना सोशल डिस्टन्सिंगचा नियम राखत बाजार समितीत काम देण्याची मागणी सुध्दा हमालांनी केली आहे. जर धर्मकाट्यावर शेतमालाचा वजनमाप केला जाईल तर हमाल, मापारी, मजूर वर्ग मजूरी पासून वंचित राहतील त्यामुळे पूर्ववत सोशल डिस्टन्सिंगचा राखत शेतमालाचा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात यावा त्यामुळे हमालांच्या हाताला काम मिळेल व ते मजुरीपासून राहणार नाही व इलेक्ट्रॉनिक धर्मकाट्यावर वजनमाप केला तर हमाल, मापारी महिला, पुरूष मजुरीपासून वंचित राहतील.सोशल डिस्टन्सिंगचा फज्जातुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुल्या मार्केड यार्डात शेकडो हमाल, मापारी, महिला-पुरूष मजूरवर्ग आपल्या नियमीत मजुरीपासून वंचित राहिल्याने त्यांनी चक्क धर्मकाट्यावर ठिय्या मांडला असल्याने येथे गर्दी झाली होती. दरम्यान येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

टॅग्स :Socialसामाजिक