लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मराठा समाजाला इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गात वेगळे आरक्षण देण्यासाठी शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी खासदार नाना पटोले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदनाद्वारे केली आहे.बुधवारला मुंबईतील आॅगस्ट क्रांती मैदानावर मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी होत असलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. या पत्रानुसार, महाराष्ट्रात मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे. म्हणूनच या समाजाला ओबीसी प्रवर्गात वेगळे आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. मराठा समाजाने आपल्या मागणीसाठी ९ आॅगस्ट रोजी मुंबईतील आॅगस्ट क्रांती मैदानावर मोर्चाचे आयोजन केले आहे.मराठा समाजात बहुतांश लोक गरीब आहेत. या समाजाचे मागासलेपण दूर होण्यासाठी या समाजाला इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गात वेगळे आरक्षण देण्यासाठी शासनाने दखल घेण्याची आवश्यकता असल्याची मागणीही खासदार नाना पटोले यांनी या निवेदनात केली आहे.
ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला वेगळे आरक्षण हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 23:50 IST
मराठा समाजाला इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गात वेगळे आरक्षण देण्यासाठी शासनाने दखल घ्यावी, .....
ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला वेगळे आरक्षण हवे
ठळक मुद्देनाना पटोले : पंतप्रधानांकडे मागणी