लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा (चौ.) : शासनाकडून सर्वसामान्यांना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी शासनाकडून सर्व्हे करण्यात येतो. मात्र आजही पवनी तालुक्यातील कोसरा येथील शिवा कामथे यांचे गेल्या अनेक वर्षापासून धोकादायक झोपडी कुटुंबासह वास्तव्य आहे. घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने कामथे कुटुंबिय त्रस्त झाले आहेत.पवनी पंचायत समिती अंतर्गत कोसरापेठ येथील रहिवासी असणाऱ्या शिवा कामथे यांचे विटामातीचे घर गत पाच वर्षापुर्वी पडले आहे. त्यानंतर प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आजही कामथे यांना आपल्या कुटुंबासह जीव मुठीत घेवून झोपडीत रहावे लागत आहे. घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने रस्त्याकडेला झोपडी बांधून कामथे राहत आहे. सरपटणारे विषारी साप तसेच किटकांचा वावर वाढल्याने जीवाला भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे कुटुंबातील एखाद्याचा जीव गेल्यावर घरकुलाचा लाभ देणार काय, असा संतप्त सवाल कामथे कुटुंबियांनी प्रशासनाला केला आहे.शिवा कामथे यांचे नाव ड यादीमध्ये समाविष्ट आहे. यशवंतराव मुख्य वसाहत योजनेत नाव समाविष्ट केले आहे. त्यांना लवकरच घरकुल योजनेचा लाभ मिळेल.- विजय मुंडे, ग्रामविस्तार अधिकारी, कोसरा
घरकुलाअभावी अनेकांचे आजही धोकादायक झोपडीत वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST
पवनी पंचायत समिती अंतर्गत कोसरापेठ येथील रहिवासी असणाऱ्या शिवा कामथे यांचे विटामातीचे घर गत पाच वर्षापुर्वी पडले आहे. त्यानंतर प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आजही कामथे यांना आपल्या कुटुंबासह जीव मुठीत घेवून झोपडीत रहावे लागत आहे.
घरकुलाअभावी अनेकांचे आजही धोकादायक झोपडीत वास्तव्य
ठळक मुद्देकोसरा येथील प्रकार । खऱ्या गरजुंना घरकुलाचा लाभ मिळता मिळेना